आमच्याबद्दल

आम्ही कोण?


आम्ही कोण म्हणुनी काय पुसता, आम्ही असू ‘नेट’के


ब्लॉगाने दिधले असे जग तये, आम्हांस खेळावया
विश्वी या प्रतिभाबले विचरतो, चोहीकडे लीलया….


वगैरे वगैरे…


असो! ही आपली थोडी गंमत!


आम्ही तुमच्यासारखेच, तुमच्यातलेच. पांढर्‍यावर काळं करण्याची हौस असलेले, मायबोलीतली अक्षरं बघून सुखावणारे, नेटावर नेटानं मराठी मुद्रा उमटवण्यात आघाडीवर असलेले, कामाधामांतून रात्री जागवत वाचनलेखन हौशीनं करणारे – मराठी ब्लॉगर्स!


२००८ साली आम्ही एकत्र येऊन इंटरनेटवरचं निवडक लेखन प्रकाशित करण्याचा घाट घातला.


“माणसं लिहीत होती.
भाषा मरत असताना,
संस्कृतीला धोका असताना,
ब्रेनड्रेन होत असताना,
साहित्यिक नियतकालिकं माना टाकत असताना
माणसं लिहीत आलीयेत.
माणसं लिहितायत.
अजूनही…”


असं म्हणत. मजा आली, येत राहिली, येत गेली.


तेव्हापासून कधी नियमितपणे, कधी ब्रेक घेत, कधी थोडं आळसावून, कधी थोडं फुशारून- (अ)नियमित उत्साहानं आमचं ‘रेषेवरची अक्षरे’ हे (अ)नियतकालिक काढतो आहोत.


आमच्या पहिल्यावहिल्या अंकाची प्रस्तावना तुम्हांला इथे वाचता येईल, तर वर दिलेली कविता पुढे वाचायची असेल, तर इथे मिळेल. जरूर वाचा.


वाचत राहा आणि हळूहळू लिहितेही व्हा…


बाकी ओळख असू द्या, लोभही… 🙂


आदूबाळ, ए सेन मॅन, नंदन, मेघना भुस्कुटे, संवेद


संपादक मंडळ

***
Facebook Comments