Posts

Showing posts from December, 2016

वाचनीय दिवाळी अंक - लोकमत दीपोत्सव

Image
- अंतरा आनंद

बॅग उचलून वाट फुटेल तिथे जाणार्‍या बॅगपॅकर्सपासून ते प्रवास म्हणजे खान-पान आणि आराम असं समीकरण मांडणार्‍या प्रवासी कंपन्यांसह प्रवास करणारे प्रवासी, असे अनेक प्रकार प्रवासाचे आणि प्रवाशांचेही. पण प्रत्येक जण स्वत:च्या नकळत प्रवास करतच असतो. लहानपणीच्या बोबड्या बोलांपासून ते बोळक्या तोंडातून निघणार्‍या बोलांपर्यंतच्या प्रत्येकाच्या प्रवासात अनंत प्रवास सामावलेले असतात. अशा प्रवासांचं वेगळेपण टिपणारा दिवाळी अंक म्हणजे लोकमतचा 'दीपोत्सव'.

मोटार, रेल्वे, विमान या सर्वांहून भारी असं प्रवासाचं साधन म्हणजे सायकल. या सायकलीचं चित्र असलेलं अंकाचं मुखपृष्ठ लक्ष्यवेधी आहे. दिवाळी म्हणून की काय, या सायकलला झालर लावलीय. तोरणासाठी पानं-फुलं घेऊन चाललेल्या या सायकलच्या कॅरिअरवर फटाक्यांच्या पेट्या तर आहेतच, पण मागे छत्रीही लावलीय. दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठाची पठडी मोडणारं असं हे मुखपृष्ठ. आपला अंकाबरोबरचा प्रवास तिथूनच सुरू होतो.

लोकमतच्या पत्रकार चमूने एनएच-44 या महामार्गावरून कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत केलेला प्रवासावर आधारित 'एनएच 44' हा लेख हा या अंकाचा विशेष भाग.  खर…

समकालीन आणि सखोल - युगांतर

Image
- मेघना भुस्कुटे
आपण एखाद्या विचारसरणीच्या बाजूचे असलो, की त्या विचारसरणीला अनुकूल अशा लेखनाचं मूल्यमापन करताना आपण पुरते तटस्थ असत नाही. तर या मर्यादेचं काय करायचं, असा एक पेच मला 'साप्ताहिक युगांतर'च्या दिवाळी अंकाबद्दल लिहिताना पडला आहे. पण समकालीन गोष्टींना प्रतिसाद देण्याच्या बाबतीत आणि लेखनशैलीच्या बाबतीत इतकं वैविध्य, दर्जा आणि तातडी जपणारा एकसंध अंक हाती आलेला असताना त्याबद्दल लिहिणं अत्यावश्यकच आहे. तटस्थपणा कुठवर ताणायचा, असा एक प्रश्न माझा मलाच विचारून मी अंकाबद्दल बोलणार आहे.
व्याप्तिनिर्देश (disclaimer) संपला.
एक कोणतंतरी सूत्र घेऊन त्यावर विशेषांक काढण्याची टूम सध्या दिवाळी अंकांमध्ये लोकप्रिय आहे. अशा प्रकारची कोणतीही घोषणा न करता, 'साप्ताहिक युगांतर'चा अंक एका विशिष्ट सूत्राभोवती नैसर्गिकपणे उगवून आल्यासारखा भासतो. जगाला विनाशाकडे लोटणारं आजच्या भांडवलशाहीचं प्रारूप आणि त्यामुळे बदलतं जग, हे ते सूत्र आहे. अनेक अभ्यासपूर्ण आणि समयोचित लेख, ललित लेख, कथा आणि विशेषतः कविता यांमधून हे सूत्र कधी पार्श्वभूमीला, तर कधी पुरोभूमीला; मूकपणे उभं असल्याचं जाणवत राहतं…

डिजिटल दिवाळी : आकाराने मोठा आणि रूपाने सुबक अंक

Image
- ऋषिकेश
तुम्ही कधी, रांगोळ्या-बिंगोळ्या घालून, लय भारी वातावरण तयार करून, चांदीच्या ताटात भरपूर वाट्या असणारी 'थाली' लोकांना खिलवणार्‍या काही हॉटेलांत गेलायत का? तिथलं वातावरण, आसनव्यवस्था, अदबशीर वेटर्स, मंद संगीत, अतिशय सुरेख पद्धतीनं भरलेलं 'देखणं' ताट यांमुळे तुम्हांला सपाटून भूक लागते का? अशी भूक लागल्यावर पहिल्याच घासात खडा लागला, आणि मग एकापेक्षा एक छान नावं असलेल्या प्रत्येक वाटीतला पदार्थ खाताना - एखादीत गुंतवळ, तर दुसरीतल्या पदार्थात मीठ कमी, एका वाटीतल्या पदार्थात नुसताच मसाला, तर दुसरीतली भाजी पोटात कच्ची - अश्या निरनिराळ्या बाबी खटकायला लागल्या तर? नि शेवटी बाहेर पडताना पोट भरलं तर खरं, पण तोंडाला चव अशी आली नाहीच; उलट अती गोग्गोडपणानं एक प्रकारचा चिकटाच आला, तर तुम्ही काय म्हणाल?
मला नेमकं तेच 'डिजिटल दिवाळी' या दिवाळी अंकाबद्दल म्हणायचंय!
खाणं हा जगाला एकत्र आणणारा विषय. त्यावर सर्वच भाषांतून सतत आणि ढीगभर लिहिलं, बोललं, वाचलं आणि म्हटलं जात असतं. नि तरीही समाधान होत नाही. सगळ्यांनाच त्यावर आणखी काहीतरी म्हणायचं असतंच. मराठी आंतरजालही खाणेपिणे या …

विचक्षण संपादकांचा 'मुक्त शब्द'

Image
- रमताराम
दिवाळी अंक तयार करणे म्हणजे लेखकु बनण्याची इच्छा पुरी झाल्यानेच 'सुखिया जाला' समजणार्‍यांचे लेखन जमा करून जाहिरातींच्या अधेमधे मजकूर टाकून दोन-एकशे पाने भरून काढणे, इतक्या माफक व्याख्येपर्यंत आपण येऊन पोचलो असताना, 'संग्राह्य दिवाळी अंक' ही संकल्पना अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच अनेक दिवाळी अंक हे वर्षानुवर्षे 'पकडून ठेवलेल्या' लेखकांच्या जुन्या लेखनाच्या आवृत्त्यांची भरताड करून काढले जात असताना 'संपादक' नावाचा प्राणी फक्त मॅनेजर याच पातळीवर शिल्लक राहिला आहे का, अशीही शंका येऊ लागली आहे. या वर्षीचा 'मुक्त शब्द'चा दिवाळी अंक मात्र याला सणसणीत अपवाद ठरावा असा. नगण्य जाहिराती घेऊन; खोगीरभरती लेखनाऐवजी वैचारिक लेखनाला समाविष्ट करत; अंकाचा पुरा फोकसच त्या प्रकारच्या लेखनावर ठेवण्याचे धाडस करत; संपादकांनी संपूर्ण अंकाला एक निश्चित चौकट दिली आहे आणि त्या आधारे लेखन निवडले आहे किंवा त्या-त्या विषयातील अधिकारी व्यक्तींकडून लिहून घेतले आहे. एखाद-दोन अपवाद वगळले, तर त्यांतला कोणताच लेख 'चाळला नि सोडून दिला'  असे करताच येणार नाही.…