ललित, दिवाळी २०१६

- अनिरुद्ध गोपाळ कुलकर्णी

ललितचं हे  त्रेपन्नावं वर्ष आहे२०१४ सालापर्यंत, त्यातल्या पन्नास दिवाळी अंकांची मुखपृष्ठं, जी आतल्या बहुतेक लेखनापेक्षा सरस असायची, ती वसंत सरवटे यांनी केलीत्यांच्या २०१४ सालच्या चित्रात त्यांतली काही मुखपृष्ठं दिसतायत.

मागल्या आणि ह्या वर्षी सतीश भावसारांनी  मुखपृष्ठ केलं. ह्या वर्षी ते छान जमलं आहे. 'कथा, कादंबरी, कविता ललित गद्य या सर्जनशील साहित्याची स्थितीगती' अशी लेखमाला अंकात आहे. त्यावर आधारित आणि सरवटेंच्या वरच्या चित्राने प्रेरित असं ते चित्र आहे. त्याला संलग्न अशी आणखी दोन चित्रं आत आहेत. अर्थात याही वर्षी 'ललित'च्या मुखपृष्ठावरती सरवटे आहेतच, कारण त्यावरचं 'ललित' हे शीर्षक ही त्यांचीच निर्मिती आहे.


***

अलीकडे मासिक 'ललित'मध्ये मला काय आवडतं, तर ते म्हणजे अनंत देशमुखांनी समन्वयित केलेलं सदर 'पन्नाशीपूर्वींची पुस्तके'. त्या सदरात शोभेल असा लेख स्वतः देशमुखांनीच या अंकात लिहिलाय 'वसंत हजरनीस यांची कविता'. नाट्यछटाकार दिवाकरांची आठवण करून देणारा, पण मिश्किल असा हा कवी (१९२३-१९६७) विस्मृतीत कसा गेला याचं आश्चर्य वाटतं.
हजरनीसांनी . धों. कर्व्यांची फिरकी कशी घेतली पाहा:
"नग्नसंध आणि।  लैंगिक मासिके।
यांनीच रे, डोके।  शांत केले।।
किती मजा आली। बायकांची झाली।
अदलाबदली। मित्रांमध्ये।।  
बायका पुरुषी। पुरुष बायकी।
खाती कफ्फी-पक्की। प्रेम रोटी ।।"
हे वाचून कर्वे खवळले आणि त्यांनी हजरनीसांची गणना त्यांना आधीच नावडत्या असलेल्या कोणा मर्ढेकरांच्या खालोखाल केली!
त्याच मालिकेत शोभेल असा लेख  लीला दीक्षित यांनी मराठीत प्रथम १८५४ साली प्रकाशित झालेल्या आणि १९५४पर्यंत किमान १८ आवृत्ती निघालेल्यानवनीत या पुस्तकावर लिहिला आहे.
***

संजीवनी खेरांनी जॉन के (John Keay) या माझ्या आवडत्या इतिहासकारावर लेख लिहिला आहे.  त्याच्या अनेक पुस्तकांचा मराठी वर्तुळाला परिचय करून देणं मलाहीअगत्याचं वाटतंखेरांचा हा लेख ते काम यथायोग्य करतोपण जॉन के यांच्या वेगळेपणावर आणि संदेहवादावर (skepticism) हा लेख पुरेसा प्रकाश टाकत नाही.
आपल्याकडचं बरंच इतिहासलेखन व्यक्तिपूजक आणि व्यक्तिकेंद्रित असतं. पण मला मात्र संदेहवादी (skeptic) इतिहासकार आवडतात. आणि के तसे आहेत. त्याचं एक उदाहरण खाली देतोय.  
याच अंकात आशा बगे यांचा कै. आनंद विनायक जातेगांवकरांवर लेख आहे. बगे यांनी जातेगावकरांच्या 'अस्वस्थ वर्तमान' या पुरस्कारप्राप्त पुस्तकाचा उल्लेख केला आहे. त्या पुस्तकातलं हे वाक्य (बाबरी मशीद पडण्याच्या  अनुषंगाने भारतीय / वैदिक संस्कृतीबद्दल केलेलं) पाहा
"...आजवर हजारो मंदिरं पाडली गेली असतील, लेण्यांतील मूर्तींची तोंडं फोडून हात तोडले गेले असतील. परंतु कुणाचंही प्रार्थनास्थळ या समाजानं, या परंपरेने, या जीवनपद्धतीनं कधी तोडलं नाही…".
हा भाबडेपणा आहे. जातेगांवकरांनी पुस्तकाचं नाव 'बखर वर्तमानाचीठेवायला होते. कशावरून म्हणतोय मी हे? वाचा जॉन के:
"...In the course of perhaps several campaigns, more triumphs were recorded by the Cholas, more treasure was amassed, and more Mahmudian atrocities are imputed. According to a Western Chalukyan inscription, in the Bijapur district the Chola army behaved with exceptional brutality, slaughtering women, children and brahmans and raping girls of decent caste. Manyakheta, the old Rashtrakutan capital, was also plundered and sacked...

...The classic expansion of Chola power began anew with the accession of Rajaraja I in 985. Campaigns in the south brought renewed success against the Pandyas and their ‘haughty’ Chera allies in Kerala, both of which kingdoms were now claimed as Chola feudatories. These triumphs were followed, or accompanied, by a successful invasion of Buddhist Sri Lanka in which Anuradhapura, the ancient capital, was sacked and its stupas plundered with a rapacity worthy of the great Mahmud...

...When, therefore, Rajendra I succeeded Rajaraja and assumed the reins of power in 1014, his priority was obvious. Sri Lanka was promptly reinvaded and more treasures and priceless regalia seized; prising open even relic chambers, says a Sri Lankan chronicle, ‘like blood-sucking yakkhas they took all the treasures of Lanka for themselves’..."

('India A History: From the Earliest Civilisations to the Boom of the Twenty-First Century', 2000/ 2010)

(या विषयावर मी माझ्या ब्लॉगवर जास्त विस्ताराने इथे लिहिलं आहे.)
या प्रकारची लेखकाची सत्याधारित चिकित्सा आपण का करत नाही? जातेगावकरांवरचा लेख वाचूनही मला हा प्रश्न पडला.
***

'कथा, कादंबरी, कविता ललित गद्य या सर्जनशील साहित्याची स्थितीगती' लेखमालेत चार लेख आहेत. यांतला पहिला लेख चाळला. त्यात मोनिका गजेंद्रगडकरांनी सोशल मीडियाला जवळजवळ सर्जनशील साहित्याचा 'मारेकरी' ठरवलं आहेत्या पुढे म्हणतात :
''Reading a book' म्हणजे एक कमिटमेंट असते. पुस्तकाशी तशी त्या लेखकाशीही. त्यासाठी संयमही लागतो (patience) नि चिकाटीही लागते. तीच ही सोशल माध्यमे संपवत चालली आहेत. (अर्थात याला अपवाद आहेतही. या मिडियावर होणारं सगळंच लेखन टाकाऊ असतं असं नाही. काही ब्लॉग्ज, काही चर्चा, काही लेखनं, त्यांतली उत्कटता, चिंतन अस्सल असतं!) दुसरं, सोशल मिडियावरचं हे लेखन प्रासंगिक, अल्पजीवी असतं. गंभीरपणे ते लिहिलं जातंच असं नाही आणि ते गंभीरपणे वाचलंही जातंच असं नाही. उलट, ते गंभीरपणे वाचण्याची अपेक्षाही नसते. पण ते त्या त्या वेळी प्रभावी मात्र वाटतं. या सगळ्यामुळेही सर्जनशील लेखन वाचण्यातला वाचकांचा ’रस’ कमी होत गेला आहे...'
मला हे अजिबात मान्य नाही. अशा गोष्टींची कारणमीमांसा क्लिष्ट आहे आणि नेमक्या शब्दांत पकडणं अशक्य आहे. पण कागदी पुस्तक वाचलं याचा अर्थ वाचकाची कमिटमेंट आहे आणि सोशल मिडियावर वाचलं याचा अर्थ वाचकाची कमिटमेंट नाही, हे अतिशय पोरकट विधान आहे. या गोष्टी माध्यमावर अवलंबून असतात असं मला वाटत नाही. माझ्या मते, चांगलं साहित्य हे कमी-जास्त प्रमाणात उपभोगलं (consume) जातं आणि राहीलच, मग माध्यम कोणतंही असो. खरंतर मराठी साहित्यविश्वातल्या कितीतरी गोष्टींनी या माध्यमाशी जुळवून घेण्याची गरज आहे.
खुद्द 'ललित'ला इंटरनेटचं वावडं आहे'वाङ्मयशोभे'चे अंक जसे त्यांनी इंटरनेटवर उपलब्ध करून दिले आहेत, तसे 'ललित'चे गेल्या त्रेपन्न वर्षांतले ठरावीक अंक ऑनलाइन, सर्चेबल अशा फॉर्ममध्ये का उपलब्ध होऊ शकत नाहीत? मोनिका गजेंद्रगडकरांना 'सोशल मिडिया साहित्यआवडत नसेल, पण त्या सध्या ज्या 'मौजप्रकाशनाचं काम पाहतात, त्या 'मौजे'चं आणि 'सत्यकथे'चं मराठी साहित्यातलं स्थान वादातीत आहे'मौजे'चे आणि 'सत्यकथे'चे सर्व अंक इंटरनेटवर उपलब्ध का करून देता येत नाहीत?
हाच प्रश्न मला सर्व दिवाळी अंकांच्या मालकांना आणि संपादकांना विचारायचा आहे. महाराष्ट्राच्या मध्यमवर्गाचा कित्येक दशकांचा इतिहास या अंकांतून बंदिस्त आहे. मराठीत इंटरनेटशिवाय निर्माण  झालेले बहुतेक ज्ञान आणि करमणूक हे कायमचं नाहीसं होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आणि आपण सोशल मिडियावरच्या गोष्टी कशा गंभीर नाहीत, असं काहीतरी पोरकट विधान करण्यात रममाण आहोत.
रामायण, महाभारत, तुळशीदास, तुकाराम वाचले / ऐकले / पाहिले जात राहतीलचसर्जनशील साहित्याबद्दल यापेक्षा जास्त कोणतंच भाकीत  मला करता येत नाही.
***

कै. रा. चिं. ढेऱ्यांवरती वर्षा गजेंद्रगडकरांचा लेख आहे. मला ढेरे हे लेखक म्हणून फार कंटाळवाणे वाटतातविकत घेऊनसुद्धा मी त्यांचं एकही पुस्तक अर्धंसुद्धा वाचू शकलो नाहीये आणि तसाच हा लेखही.
***

नीलिमा भावे कृत 'मराठीतील अनुवाद संस्कृती'तील पुढील विधान वाचून उडालोच
''... अरुण कोलटकर हे मराठीतील द्वैभाषिक कवीचे जवळजवळ एकमेव नाव आहे आणि किरण नगरकर यांचे द्वैभाषिक कादंबरीकार म्हणून...''.
विलास सारंग जाऊन जेमतेम दीड वर्ष होतंय. विसरलो त्यांना? सारंगांनी कोलटकरांइतकंच आणि नगरकरांपेक्षा सरस काम या क्षेत्रात केलं आहे. माझ्याकडे सारंगांनी मर्ढेकरांच्या इंग्रजीत अनुवादित केलेल्या कवितांचा खासगी-वितरणासाठी असलेला संग्रह आहे. दिलीप चित्र्यांच्या अनुवादित कवितांचा दर्जा वादातीत आहे. सारंगांनी अनुवादित केलेल्या कवितांचा दर्जाही दिलीप चित्र्यांच्या तोडीस तोड आहे.
***

'पुराव्याचा आधार नसलेल्या धर्मश्रद्धेला आव्हान देणाऱ्या वैज्ञानिकाचे आत्मचरित्र' या शीर्षकाखाली विवेक गोविलकर यांनी रिचर्ड डॉकिन्सच्या आत्मचरित्राचं परीक्षण लिहिलं आहे. महाराष्ट्रात नास्तिकता आणि पुरोगामित्व यांची मोट एकोणिसाव्या शतकात आगरकर प्रभृतींमुळे पहिल्यांदा बांधली गेली. एकविसाव्या शतकात ती जास्त घट्ट झाली आणि त्याचं श्रेय रिचर्ड डॉकिन्सना काही प्रमाणात जातं
'पुराव्याचा आधार नसलेल्या धर्मश्रद्धे'लाश्रद्धेला कुठला पुरावा पाहिजे? तो काय शास्त्रीय प्रयोग आहे की ऐतिहासिक वा सामाजिक सिद्धांतसरळ म्हणा ना, 'धर्माला आव्हान देणाऱ्या वैज्ञानिकाचे आत्मचरित्र'! डॉकिन्सनापण तेच आवडेल!
जॉन ग्रे (John N. Gray) यांचे याच पुस्तकाचे दीर्घ परीक्षण वाचण्यासारखे आहे. ते म्हणतात :
"... To suppose that science can liberate humankind from ignorance requires considerable credulity. We know how science has been used in the past—not only to alleviate the human lot, but equally to serve tyranny and oppression. The notion that things might be fundamentally different in the future is an act of faith—one as gratuitous as any of the claims of religion, if not more so. Consider Pascal. One of the founders of modern probability theory and the designer of the world’s first mass-transit system, he was far too intelligent to imagine that human reason could resolve perennial questions. His celebrated wager has always seemed to me a rather bad bet. Since we cannot know what gods there may be (if any), why stake our lives on pleasing one of them? But Pascal’s wager was meant as a pedagogical device rather than a demonstrative argument, and he reached faith himself by way of skeptical doubt. In contrast, Dawkins shows not a trace of skepticism anywhere in his writings. In comparison with Pascal, a man of restless intellectual energy, Dawkins is a monument to unthinking certitude."
या प्रकारची चीर-फाड आपण का करत नाही? कोणत्याही व्यक्तीचं एका क्षेत्रातलं काम कितीही मोठं असलं, तरी तिच्या कामात उणिवा नसतात असं नाही. आपण अशा उणिवा वस्तुनिष्ठपणे दाखवून देत नाही. यामुळे त्या व्यक्तीचं जिवंत चित्र उभं राहत नाही. एखादाच गुण दाखवणारं द्विमित चित्र शिल्लक उरतं. याही लेखातून यापेक्षा निराळं काही झालं नाही, ही निराशेची बाब वाटली.
***

रा. . कुंभोजकरांनी . गो. जोशींवर लेख लिहला आहे. . गो. जोशी हे काहीसे जुन्या वळणाचे कथाकार'शेवग्याच्या शेंगा' या त्यांच्या गाजलेल्या कथेमुळेच ते अनेकांना माहीत असतात. त्यांच्यावरच्या लेखातलं एक वाक्य मला खूप आवडलं:
''सामान्य माणसे सुंदर नसतात, ध्येयवादी आणि त्यागीही नसतात. वाट्याला आलेले सामान्य आयुष्य रस घेऊन ती जगताना दिसतात...''
. गोंचे नायक सामान्य होते. वास्तविक य. गो. जोशी हे वि. स. खांडेकर आणि ना. सी. फडके यांना समकालीन. खांडेकरांचे नायक ध्येयवादी असत, तर फडक्यांचे अविश्वसनीयपणे रुबाबदार आणि श्रीमंत. य. गोंचे नायक मात्र या दोन्ही चौकटीतून सुटलेले असत. या वैशिष्ट्याबद्दल हा लेख अचूक बोलतो.
***

प्रवीण दशरथ बांदेकरांचा लेख चेर्नोबिल दुर्घटनेवरच्या 'Voices from Chernobyl: The Oral History of a Nuclear Disaster' या Sviatlana Aleksievich यांनी १९९७ साली लिहिलेल्या  पुस्तकावर आधारित आहे. लेखिका २०१५च्या साहित्य नोबेल पुरस्कार  विजेत्या आहेत. माझ्या अपेक्षेप्रमाणेच हे परीक्षण जैतापूरला जाऊन पोचतं. पुस्तकाबद्दल काही फारशी चर्चा होते की नाही, हा मुद्दा अलाहिदा. पण बांदेकरांना जैतापुरात हा प्रकल्प व्हायला नको आहे, हे मात्र आपल्याला लगेच समजतं. भविष्यातलं जैतापूर इतकं भीषण असेल, तर भारतात सध्या अणुभट्ट्या असलेली इतर सात गावं कशी असतील या विचाराने काळजाचं पाणी-पाणी होतं आणि आपल्या बडबड-लोकशाहीत त्या गावातली लोकं इतकी शांत आणि हतबल कशी असाही मनात विचार येतोअसं का व्हावं? आपण आपली विचारधारा, आपला वैचारिक कल पूर्णपणे बाजूला ठेवू शकत नाही हे खरं. पण साहित्याबद्दल बोलताना आपण त्याखेरीज काही गोष्टींवर बोलणं अपेक्षित आहे, हे आपल्याला का समजत नाही?
बांदेकरांनी नोबेल पुरस्कारासंबंधीपण बरंच मंथन केलंय :
''... लेखक समकालीन जगाचा विचार  कसा करीत आहे, त्याचे संबंधित पुस्तक आणि त्याच्या प्रकाशित झालेल्या अन्य लेखनामधून कोणती जीवनदृष्टी व्यक्त होत आहे, मानवकेंद्रित कोणती  मूल्ये मांडली जात आहेत, तो या जगातील वास्तवाकडे कोणत्या नजरेने पाहतो आहेही  गोष्ट समितीला महत्वाची वाटते आहे... विशेषतः पर्यावरणवादी, मानवतावादी मूल्यांची जपणूक करणारे... ...लेखन पुरस्कारासाठी विचारात घेतले जात आहे...''
हे वाचून पहिला खवचट मनात विचार आला, की प्रश्न मानवतावादाचाच असता, तर कै. वि. स. खांडेकरांना नोबेल नक्कीच मिळालं असतं. नंतर मी विकिपीडियावर अलीकडील विजेत्यांचा संक्षिप्त परिचय आणि त्यांची सायटेशन वाचू लागलो. मला तरी त्यात पर्यावरणवादी, मानवतावादी मूल्ये वगैरे शब्द त्यांच्या निकषांत कुठे दिसले नाहीत. 
आपल्याला भारतात जास्त परिचित असलेले या शतकातील तीन लेखक पाहू:
१. बॉब डिलन, २०१६ :
'...for having created new poetic expressions within the great American song tradition.'
२. ओरहान पामुक, २००६:
'...who in the quest for the melancholic soul of his native city has discovered new symbols for the clash and interlacing of cultures.'
३. सर व्ही. एस. नायपॉल, २००१ :
'...for having united perceptive narrative and incorruptible scrutiny in works that compel us to see the presence of suppressed histories.' 
हे लेखक मानवतावादी आहेत, म्हणून त्यांना नोबेल मिळालं आहे? की त्यांच्या कामात काही साहित्यगुण आहे, म्हणून त्यांना नोबेल मिळालं आहे? मराठीतल्या बहुतेक वैचारिक लेखनात मला या प्रकारच्या नेमकेपणाचा आणि संदेहवादाचा (skepticism) अभाव कायम जाणवत आला आहे. बहुतेक सगळे जण एका ठरवून घेतलेल्या तथाकथित योग्य भूमिकेतून इतक्या ठामपणे सगळं बोलत असतात... की ते एका टप्प्यावर हास्यास्पद होऊ लागतं. आणि म्हणूनच मला जास्त भावतात पास्कल आणि जॉन केंसारखे लेखक!
***

'ललित'चं घोषवाक्य असं आहे :
'ग्रंथप्रेमी मंडळाच्या सहकार्याने ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार आणि ग्रंथसंग्रह या विषयांना वाहिलेले मासिक'.
हा दिवाळी अंक बऱ्याच प्रमाणात या घोषवाक्याला धरूनच काढलेला आहे. १८२ पानांचा, अतिशय कमी जाहिराती असलेला अंक १२० रुपयांना मिळतो आहे. पण मला खुपलेली गोष्ट म्हणजे विषयांत जरी वैश्विकता असली, तरी विचारांत ती पुरेशी  नाही. बहुतेक लेखक आपल्या लेखनासंबंधी अगदी मर्यादित दृष्टिकोनातून विचार करताना दिसतात. संदेह जवळजवळ नाहीच. दृश्यकलांचे उल्लेख, तो विषय नसेल, तर क्वचितच.
हे कधी बदलेल?

इमेल : anikulkarni60@gmail.com
Post a Comment