शुभ दीपावली!

'रेषेवरची अक्षरे'चा ऐसपैस अंक तुमच्या हातात देताना मस्त वाटतंय. मधला तीन वर्षांचा ब्रेक सार्थकी लागला असं वाटावं, इतकी मजा या अंकाचं काम करताना आली. सवडीनं आणि आवडीनं अंक जरूर वाचा नि तुमचा अभिप्राय कळवा. सूचना, सुचवण्या, दाद आणि प्रश्न... सगळ्याचं 'दिल खोल के' स्वागत आहे.

सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ज्यांच्या दिवाळीवर दुर्दैवाने दुष्काळाचं सावट अाहे त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर देऊ या अाणि ही दिवाळी संयतपणे साजरी करू या.

संपादक
रेषेवरची अक्षरे
२०१५
***
***
1 comment