शुभ दीपावली!

... तर तीन वर्षांनंतर 'रेषेवरची अक्षरे'चा एक नवा अंक पुन्हा एकदा तुमच्यासमोर ठेवत आहोत. नोंदी गेल्या तीन वर्षांतल्या अाहेत नि फोरम्सही अाहेत यंदा, त्यामुळे अंक जरा नेहमीपेक्षा ऐसपैस झाला अाहे...


अनुक्रमणिकेतले काही विभागच अपडेट झालेले दिसतील, काहींच्या लिंका अजुनी अपडेट व्हायच्या असतील. दचकू नका. ही उ०सं०डु० नव्हे! यंदा ४ नोव्हेंबरपासून सुरुवात करून ७-८ नोव्हेंबरच्या वीकान्तापर्यंत टप्प्याटप्प्यानं अंक प्रकाशित करतो आहोत. तूर्तास कथा, कविता, काही ललित लेखन आणि ऑनलाईन लेखनावरचा एक छोटेखानी विभाग प्रकाशित केला आहे... 

वीकान्ताला पुरा अंक - होय, पीडीएफसकट - तुमच्या हातात असेल.


वाचा आणि 'रेषेवरची अक्षरे'चं हे नवं रुपडं कसं वाटलं ते जरूर कळवा. सूचना, सुचवण्या, दाद आणि प्रश्न... सगळ्याचं 'दिल खोल के' स्वागत आहे.

सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ज्यांच्या दिवाळीवर दुर्दैवाने दुष्काळाचं सावट अाहे त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर देऊ या अाणि ही दिवाळी संयतपणे साजरी करू या.


संपादक
रेषेवरची अक्षरे
२०१५
***
***
Post a Comment