Uncategorized

श्रीधर तिळवे यांची मुलाखत

– राहुल सरवटे


जरी हे कबूल करताना फारसं बरं वाटत नसलं, तरी मराठी वाचकाला श्रीधर तिळवे हे नाव तितकंसं परिचित नाही हे सत्य आहे. ‘अडाहव्का बानासुना’ ही त्यांची कादंबरी, ‘क. व्ही.’ हा कवितासंग्रह आणि चौथ्या नवतेचा त्यांचा सिद्धान्त या गोष्टी माहीत असल्याच, तर आडरस्ते ढुंडाळणार्‍या विचक्षण वाचकाला ठाऊक असण्याचीच शक्यता जास्त. पण कोणत्याही पंथात आंधळेपणानं सामील न होता, जिथे न पटेल, तिथे नेमाडे यांनाही रोखठोक विरोध नोंदवणारे श्रीधर तिळवे एक महत्त्वाचे विचारवंत आहेत असं म्हटलं जातं. नव्वदोत्तरी जगाचं खरं चित्र रेखाटणारे, आणि ते चित्र फार खरं असल्यामुळेच डावलले गेलेले; एक नवा प्रवाह सुरू करण्याची ताकद असलेले लेखक ही त्यांची खरी ओळख असल्याचं त्यांचे चाहते सांगतात.


इतिहासकार राहुल सरवटे यांनी घेतलेली त्यांची ही मुलाखत ‘रेषेवरची अक्षरे’च्या वाचकांसाठी सादर करत आहोत. त्यात ‘कविता’ या एकमात्र विषयाला चिकटून न राहता अनेक निरनिराळ्या विषयांवर ते भरभरून बोलले आहेत. ते पटेल वा न पटेल; रोचक आहे, चकित करणारं आहे, रसाळ आहे, विचार करायला लावणारं तर आहेच आहे.

“मी म्हणतो आहे, ते सगळंच बरोबर असेल असं नाही. पण आपण शक्यता तरी मांडून बघायला काय हरकत आहे?” हे त्यांचं प्रांजळ विधान ऐकताना मनाशी असू द्या. अनेक नवे रस्ते दिसायला लागतील.


वेळेअभावी ही मुलाखत टंकणं शक्य झालेलं नाही, कारण दिवाळी अंकाला काहीएक मुहूर्त असतो. या मुलाखतीचं संपादनही केलेलं नाही.  तांत्रिक दृष्ट्या ती काहीशी कच्ची आहे. लिखित शब्दाला देता येते, ती संदर्भांची जोडही या मुलाखतीला दिलेली नाही, त्याबद्दलही आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आहोत.
भाग १ : 

 

भाग २:
भाग ३ (‘तिळवे भांडार’ या कवितेच श्रीधर तिळवे यांनी केलेलं अभिवाचन) :

***

 

 

Facebook Comments

4 thoughts on “श्रीधर तिळवे यांची मुलाखत”

 1. प्रिय संपादक,

  तिळवे यांच्या 'अडाहव्का बानासुना' या कादंबरीच्या प्रकाशकांचा संपर्क मिळू शकेल का? कादंबरी विकत घ्यायची आहे. जालावर उपलब्ध दिसली नाही. त्यांचा क.व्ही. हा कवितासंग्रह पॉप्युलर प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला दिसला, तो मिळवलाही. परंतु ही कादंबरी सापडत नाही. कृपया प्रकाशकाचा संपर्क मिळवून दिल्यास त्यांच्याकडून थेट विकत घेण्याचा प्रयत्न करता येईल.

  – अंजली

 2. प्रकाशकांच्या संपर्कासाठी विचारणा केली आहेच. 'नवता' प्रकाशन (कीर्तिकुमार शिंदे) यांच्याकडे चौकशी केल्यास अधिक माहिती मिळू शकेल. शिंदे यांच्या संमतीनं त्यांचा इमेल आय़दी देण्याचा प्रयत्न करते. पण इथे (http://shridhartilve.blogspot.in/) तिळवे यांचा ब्लॉग आहे. तिथेच त्यांचा इमेल आयडीही उपलब्ध आहे. थेट तिळवे यांच्याशी संपर्क करणं अधिक सोपं आणि सोयीचंही असावं.

 3. कादंबरीसाठी संपर्क-
  शब्दवेल प्रकाशन. १३०३-ए, राजघाट रोड, कोल्हापूर- ४१६०१२.
  दूरध्वनी क्रमांक- ०२३१-२६२६७६५

 4. प्रकाशनाच्या वरील संपर्कावर संपर्क साधला असता अधिक सुकर संपर्काचा मार्ग सापडला तो असा:
  सतीश पाध्ये (शब्दवेल प्रकाशन)
  राजघाट रोड, कोल्हापूर.
  उभ्या मारुती जवळ, चंद्रेश्वर गल्ली, "गर्जना मुद्रणालय".
  पाध्ये यांचा भ्रमणध्वनी संपर्क- 9921669666

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *