Uncategorized

फुकुशिमानो तोत्तोचान

– निरंजन नगरकर

tottochan

वसंताच्या लख्ख दुपारी चेरीचं फूल फुलावं
तसं  उमटतं तिच्या गोबर्‍या गालावर हसू
फुकुशिमानो तोत्तोचानवा खावाक् सुगोय देसु

तोत्तोचानच्या घरामागे खूप खूप सूर्यफुलं राहतात
रोज सकाळी सगळी सूर्याकडे एकटक पाहतात
फुलांवरच्या माश्या मात्र दिसत नाहीत आता
आणि दबून बसलीय शेतांमधे भेदरटशी शांतता

ओतोओसानचा चेहरा तिला नीटसा आठवत नाही
रविवारशिवाय कधी त्यांची भेटच झाली नाही
कोण जाणे कसला त्यांना एवढा त्रास होता
पण एक दिवस ओतोओसानगा जिसात्सु शिता

ओकाआसानच्या हसण्यातली उदासी लपत नाही
काय होणार पुढे तिला विचार करवत नाही
गाईंच्या अंगावर पडले ठिपके तिला बघवले नाही
एका देठावर फुलं दोन तोत्तोने सांगितलेच नाही

ओजिइसान रोजचा वेळ शांतपणे घालवतात
ऐंशी वय झालं तरी मजेत सायकल चालवतात
तोत्तोचानला आवडतात ते मनापासून जरी
न सांगताच थोडं आयुष्य तिचं घेतलंय तरी
शब्दार्थः
फुकुशिमानो तोत्तोचानवा खावाक् सुगोय देसु : फुकुशिमाची तोत्तो गोंडस व सुंदर आहे.
ओतोओसान : वडील
ओकाआसान : आई
ओजिइसान : आजोबा
जिसात्सु शिता : आत्महत्या केली.
***
***
चित्रस्रोत: आंतरजालावरून साभार

Facebook Comments

1 thought on “फुकुशिमानो तोत्तोचान”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *