Uncategorized

देखावे

– चैताली आहेर

अस्तित्वहीन पोकळ देखावे
माणसंच्या माणसं ओढताहेत त्यांच्या मगरमिठीत.
सुटका करू पाहणारे अडकून पडलेत
त्या देखाव्यांच्या कडांमध्ये
देहांचे घसघशीत घोस बनून…

काही भुलून मोहून
त्या देखाव्यांना सत्य समजू लागलेत
अन्‌ थिजवू लागलेत रक्त,
ज्यासाठी त्यांना मेंदू भिजवावे लागतात
यच्चयावत धर्मांच्या, जातींच्या, समूहांच्या पिंपात…

मग असे शेकडो, हजारो, लाखो मेंदू
झुलत राहतात, नाचत राहतात,
रक्ताऐवजी नशा वाहवत शरीरात…

कातडी कापली तरी, रक्ताऐवजी
घोषणाच बाहेर पडतात मग,
अगदी ऊर्ध्व लागून…

***
***

Facebook Comments

1 thought on “देखावे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *