रेषेवरची अक्षरे २०१०

'रेषेवरची अक्षरे २०१०'ची पीडीएफ आवृत्ती तुम्ही इथून उतरवून घेऊ शकता.***


आम्ही लिहितोच आहोत


पैसाच्या खांबाला टेकून किंवा गणपत वाण्याच्या बिडी बंडलाला फुंकून
मुक्तपणे कधी आणि कधी प्रमाणबद्ध आकृतिबंधात.
इरेस पडलों जर बच्चमजी तर
आम्ही मोरूच्या बोरूनेही लिहिले असते
किंवा कमळाच्या सचित्र पानांवरही.


गणिताच्या वहीत मागच्या पानांवर आम्ही लिहीत होतो
आणि लिहीत होतो कोसळणार्‍या पावसात काचेच्या तावदानावर उन्मनीपणे.
आज विदेशी कळ-फलकावर मातृभाषेच्या पाऊलखुणा शोधत
आम्ही लिहितोच आहोत.


पण नंतर असेच झाले
अट्टल कलावंताचे होते तसेच झाले
प्रश्नचिन्हांनी फेर धरले
आमचेच शब्द गर्गरा फिरले.


अप्रकट विचार तरंगासाठी असतातच का नेमके शब्द?
आणि या सांकेतिक चिन्हांतून खरंच का हो होते अर्थबांधणी?
शब्दांवर शब्द रचत आमचाच अक्षर समुच्चय तेवढा भद्र


आणि जन्म-मृत्यूचे दाखले, वाण्याची सामानाची यादी, पिवळ्या पडत चाललेल्या वर्तमानपत्रातल्या रद्दी बातम्या -
अहमद घर बघ
कमळ बस
अभय निव्वळ काना-मात्राविरहित शब्दांची लगोर रच
म्हणजे सारे जनांचे श्लोक?


शांतं पापं- शांतं पापं
शांततेत पाप आहे!
शब्दांनी कर्ण्यातून मोठा कल्ला केला...


मग वाटलं अर्थांना शब्दाच्या नव्या त्वचा द्याव्यात
जसं उमजतं तसंच समजतं का हे बघावं
बघावेत आत्मजांचे प्रवास
निराकाराकडून आकाराकडे
अर्थांकडून शब्दांकडे
स्क्रीनवरच्या शुभ्र धुक्यातून
काळ्या पूर्णविरामाकडे.


***


अनुक्रमणिका


०१. माझ्या प्रियकराची प्रेयसी - मेघना भुस्कुटे
०२. आरं गोयिंदा रं गोपाला - सतीश गावडे
०३. रेघांमागून - प्रसाद बोकील
०४. प्रतिनिधी - सखी
०५. केवळ दुःखच - क्षिप्रा
०६. आम्ही गडकरी - श्रद्धा भोवड
०८. आर्तव - मंदार गद्रे
१०. ऊन की बात... - अस्मि
११. कपडे - सोनल
१२. सहभोजन - अमोल पळशीकर
१५. कवितेचं नामशेष होत जाणं - ज्ञानदा देशपांडे
१७. मिणमिण - किरण लिमये
१८. निर्माल्य - स्वाती आंबोळे
१९. क्लोज एन्काउंटर्स ऑफ चायनीज काइंड - चिमण उर्फ गुरुदत्त
२१. इट जस्ट कुड हॅव बीन हिज मास्टरपीस - विद्याधर नीळकंठ भिसे
२२. बुद्ध - अ सेन मॅन
२३. बी. पी. ओ. - नचिकेत गद्रे

***
सहभाग
(गायत्री नातू, चिमण ऊर्फ गुरुदत्त, जास्वंदी, नंदन, नचिकेत गद्रे, यॉनिंग डॉग, राज श्रद्धा भोवड, सई केसकर, स्वाती आंबोळे)

***

Post a Comment