Uncategorized

दोन कविता

मारोतीरावांच्या कविता
१.
उरुस आला उरुस आला
चल एड्या गावाला
सकाळाच्या पारी देवदर्शन
भजनं भारूडं एकदम आध्यातमिक
काम वासना म्हंजे इंचू
डसला तर फसला
मस्त वाटतं
संध्याकाळी नाचते बाई
पावडर लावून
मला डसली इष्काची इंगळी
चावते लिपस्टिकचुटुक ओठ
उडली बट समोरची
की दहादहाच्या शंभरशंभरच्या
नोटा उडतात
फडाफडा एड्या
मस्त वाटतं
२.
पोरांपैकी एक बारावी झाला पास
अन्नांना म्हन्ला,
पल्सर पायजे म्हन्जे पायजे
येड्या
कॅश दिली कॅश
हे ढबोल्लं बंडल गांधीचं करकरीत
दुकानदार बसला पाहत
मंग काय
आयटेमला घेऊन गेला
खडकवासलाला
एड्या
ब्रेक दाबले
कचाकच!
३.
आपुन दारूचा
एक थेंबबी
लावत नाय ओठाला
जल्मात लावणार बी नाय
मित्रानसोबत जातो वडारवाडीला
हातभट्टीची एक नंबर.
आपला इंटरेस्ट
वडारणींमधे.
आपल्या गांडीच्या दोन वाट्या
म्हन्जे त्यांच्या
छातीवरला एक गोळा येड्या.
पदर कायम खाली
कॉईनबॉक्स सताड.
एकदा चिंट्या
वडारणीच्या छातीकडे
पाहत म्हन्ला
दोन फुगे पायंजे!
ती म्हन्ली
भाड्या
गल्ल्यांमध्ये लपवलन ना तुला
तर कळणार बी नाय
कुटं हरवलास ते
चल फुट्
***
बाईक सेक्स
गाडी गाडी सुसाट वारा
रोखठोक अर्जंट ब्रेक
पाठीच्या कॅनव्हासवर
मांसल मांसल उबदार शेक
कानापाशी गुणगुण भुंगी
मानेवरती ओली जीभ
सिग्नल पाळत धावे गाडी
दाबत दाबत पीप पीप
कानपाळीवर ओठ गुलबट
जणू सिल्कचा काठपदर
पोटापाशी हात घट्ट
भूक होते खाली-वर
लेदरसीट गरमागरम
ढुंगणावर घासे मांडी
मोठी मोठी होत जाते
आतल्या आत जादूची कांडी
– प्रणव सखदेव
Facebook Comments

4 thoughts on “दोन कविता”

  1. कविता आवडल्या. कोलटकरांचा प्रभाव जाणवला. (असं म्हणणं म्हणजे कसलाही आरोप नाही हे सखदेव मोकळ्या मनानी मान्य करतील याची खात्री आहे. )

    ज्यांना आपण अडाणी समजतो त्यांच्या लैंगिक जाणीवा शुद्ध अनाघ्रात असताना दिसतात. निर्लेपपणे त्या व्यक्त होतात. हा निर्भरपणा कवितेमधून सहजपणे आलेला आहे. त्यांच्या बोलण्यावागण्यातल्या विसंगतींमधूनही हलकाफुलका विनोद कसा निर्माण होतो हेही कवितेतून दिसतंय.

    असो. एखादा लेख/कविता कधीकधी लिबरेटींग वाटतो. मला असा अनुभव या कविता वाचताना आला. धन्यवाद.

  2. कविता आवडल्या म्हणाव्या तर पूर्णपणे नाहीत आणि नावडल्या म्हणाव्या तर तसंही नाही. व्हाचल्यावर हसू उमललं ते खरं पण जाहीर ऐकल्या असत्या तर ते उमललं असतंच असं नाही. एकंदरीत माझी प्रतिक्रीया मलाच कळली नाही.

  3. टांगा पल्टी घोडं फरार! मारोतीरावांचे बुभु:कार भारी आहेत एकदम – शेवटच्या कवितेचा र्‍हिदम ऑसम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *