Uncategorized

चित्रकला, लैंगिकता आणि मी २

 

“यशोवर्धनचं ‘सॅन्ड ड्यून्स’. फेमस इरॉटिक पेंटिंग. मी त्याला ‘शृंगाराचं मृगजळ’ नाव दिलं आहे.” कोठारीसांगतात. मी मान डोलावते. अगदी समर्पक नाव.
जमिनीवरच्या सोंगट्यांच्या पटावरचा फासा उचलून ते माझ्या हातात देतात. त्यावरचा स्तनाग्राचा आकारआता मला स्पष्ट दिसतो. आफ्रिकन पुतळ्याच्या हातात आता ते उमलतं, लांबसडक फुलासारखं कणीसनसतं. ते त्याचं लिंग असतं. टेराकोटाच्या तेलदिव्याचं ते नक्षीदार हॅन्डल, निळ्या सुरईवरच्या आकृत्या,कांगरा शैलीतली मिनिएचर्स, हे सगळंचंमी आता वेगळ्या नजरेनं निरखून पहाते. सगळीकडे शृंगारिकआकृत्या, आसनं चितारलेली आहेत.
“ही इरॉटिक आर्ट” कोठारी मिश्किलपणे सांगतात. माझ्या नजरेतला सुरुवातीचा संकोच, गोंधळ त्यांनानवा नसणारच. पुढचे अनेक तास मी त्यांच्या त्या अद्भुत, प्राचीन इरॉटिक आर्टच्या दुनियेत असते.त्यांच्याकडून त्या वस्तूंचा इतिहास, शैली, वैशिष्ट्य जाणून घेताना माझ्या मनावरच्या असंख्यसंकोचांच्या आवरणांपैकी काही आवरणं त्या दिवशी निश्चित गळून पडतात. कलेतली नग्नता, शृंगारइतक्या कलात्मकतेनं, सूचकतेनं आणि तरीही थेटपणे समोर आलेला मी पहिल्यांदाच पाहते. किंवाकदाचित नग्नतेतल्या कलेकडे इतक्या थेटपणे पाहण्याची माझी ती पहिलीच वेळ असू शकेल.माझ्यासारख्या (आधुनिक!) स्त्रीला हा अनुभव वयाची तिशी ओलांडल्यावर यावा यातच कुठेतरी भारतीयसमाजात कला आणि नग्नतेच्या एकत्रितपणाशी सर्वसामान्य जनांचं किती दूरत्व कसोशीने पाळलं जातंहे स्पष्ट होतं.
वयाच्या १८-१९व्या वर्षी मध्यप्रदेशातल्या जबलपूर, पंचमढीला कॉलेजची ट्रीप गेली असताना आलोचआहोत तर पाहूया म्हणून आमच्या प्रोफेसरांनी उदारपणे आम्हाला खजुराहोला नेलं होतं, तेव्हा कलेतलाशृंगार जवळून निरखण्याची एक संधी मिळाली होती. पण सोबत असलेली मुलं, प्रोफेसर्स, मनावरचेमध्यमवर्गीय संस्कार, त्या वयातला तो टिपिकल अनाकलनीय संकोच, अशा सर्व गोष्टींमुळे ती संधीअर्थातच गमावली गेली. शृंगारिक लेणी जिथं आहेत तिथून आमचा मैत्रिणींचा ग्रुप शक्य तितक्या लवकरपुढे पाय उचलायच्या गडबडीत. त्यामुळे तिथं जाऊनही सौंदर्य वगैरे काही निरखता आलं नाही आणिआपल्याला कलेतील नग्नतेविषयक जाणिवा नक्की आहेत तरी कशा याचा शोधही लागला नाही. नंतरहीसार्वजनिक जीवनात ‘कला आणि नग्नता’ एकमेकांपासून जरासे दूरच राहिलेले होते.
नग्न चित्रं किंवा शिल्पं मी कधी बघितली नव्हती असं अजिबातच नव्हतं. पिकासोचं ‘ब्लू न्यूड’ किंवारोदॅंचं ‘द किस’ दोन्ही माझ्या आवडीच्या कलाकृती. रोदँचं ‘द किस’ हे शिल्प पाहताना जाणवतं ते फक्तभावनिक प्रेम. शिल्पाची नग्नता इथे दुय्यम. अमृता शेरगिलच्या सेल्फ न्यूड्समधली तरल पॅशन मलाजाणवली होती. शुभा गोखलेची देहस्पंद चित्रमालिका पाहताना, त्या नग्न देहांवरच्या चंद्रकोरीच्यागोंदणांनी मी मोहून गेले होते. सर्पाच्या विळख्यात सामावलेलं मिलिंद सोमण आणि मधू सप्रेचं युगुलमोहक नग्नतेचं प्रतीक म्हणून मनावर ठसलं होतं. पण हे सारे अनुभव माझ्यासाठी खाजगी, वैयक्तिकपातळीपर्यंत मर्यादित होते. सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शनातली नग्न चित्रं, पेंटिंग्ज बघणं मी जरी टाळतनसले, तरी तिथं फार काळ रेंगाळलेही नव्हते. माझी एक पत्रकार मैत्रीण तर अशी चित्रं असलेल्याप्रदर्शनांमधे पाऊलही ठेवायची नाही. त्यापेक्षा माझी परिस्थिती जरा बरी होती इतकंच. पण उघडपणेकलेतली नग्नता न्याहाळून, त्यावर रसग्रहणात्मक चर्चा करण्याची, ऐकण्याची वेळ माझ्यावर कधी आलीनव्हती. नक्की कशाचा संकोच किंवा पूर्ण नग्नतेला कलामाध्यमांमधूनही थेटपणे भिडताना मनावर नक्कीकसलं दडपण येतं आणि का? याचं विश्लेषणही मी कधी केलं नव्हतं. आपण कलेचे आस्वादक आहोतपण चित्रकार नाही तेव्हा अशी मानसिकता कदाचित साहजिकच असाही विचार मनात असू शकेल.
त्या दिवशी त्या इरॉटिक संग्रहामुळे कलेतल्या नग्नतेला खुलेपणाने स्वीकारण्याच्या पातळ्यांपैकी एक मीनिश्चित ओलांडली होती. वैयक्तिक पातळीवरही माझ्यात एक बदल त्या दिवशी झाला.
निघताना डॉ. कोठारींनी मला त्यांच्या इरॉटिक संग्रहातल्या काही वैशिष्ट्यपूर्ण, दुर्मीळ वस्तूंच्याफोटोप्रिन्ट्स असलेला पोस्टकार्ड्सचा एक संच भेट दिला होता. घरी गेल्यावर माझ्या ऍडोलसन्ट वयातल्यामुलीनं कुतूहलानं ती पोस्टकार्ड्स बघायला घेतली, तेव्हा सुरुवातीला एका प्रतिक्षिप्त क्रियेतून मी मुलीच्याहातातून पटकन ती काढून घ्यायचा प्रयत्न केला.
पण मग मला डॉ. कोठारींना मी विचारलेल्या एका प्रश्नाचं त्यांनी दिलेलं उत्तर आठवलं. डॉ.कोठारींकडेसुरुवातीला वेगळी जागा नसल्यानं देशाविदेशातून जमवलेल्या त्या सगळ्या इरॉटिक वस्तू घरीच विखरूनपडलेल्या असत. त्यांची वाढत्या वयाची मुलं त्या वस्तू हाताळून बघायची. तेव्हा घरी येणारे त्यांचेनातेवाईक, मित्र वगैरे कोठारींना ‘मुलं बिघडतील तुमची’ असं सांगत.
डॉक्टर ही गोष्ट सांगत होते, तेव्हा मी डॉक्टरांना विचारलं, “कसं हॅन्डल केलंत तुम्ही त्या अर्धवटवयातल्या मुलांचं कुतुहल?”
“त्यांचा एकही प्रश्न न टाळता. त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं थेट आणि खरं उत्तर देऊन.” डॉ.कोठारींनी उत्तर दिलं होतं.
मुलांना ‘कला आणि नग्नता’ या मानवी जीवनातील दोन अत्यंत महत्त्वाच्या दृष्टिकोनांकडे कोणतीहीआडवळणं न घेता, थेटपणे बघायला शिकवणं किती महत्त्वाचं आहे!
माझी मुलगी, जी मला आडनिड्या वयाची आहे असं वाटत होतं ती, प्रत्यक्षात प्रगल्भ आयुष्याच्याउंबरठ्यावर उभी असलेली एक उत्सुक नजरेची व्यक्ती होती हे मी विसरून जात होते. इरॉटिसिझमधलीआर्ट तिला वयाच्या याच टप्प्यावर मला समजावून देता आली, तर कलेमधल्या नग्नतेला सामोरं जातानामला जो संकोचाचा सामना करावा लागला तो पुढल्या काळात तिला करावा लागणार नाही, आणित्यातूनच तिला नग्नतेतली कलाही उमजेल आणि जीवनातलं सौंदर्य ती डोळसपणे पाहायला शिकेल याचंभान मला आलं.
कलेतल्या नग्नतेला थेटपणे स्वीकारताना माझी सुरुवातीच्या काळात ही जी काही जाणिवांची तारांबळउडाली, त्यात आश्चर्य काहीच नव्हतं. माझ्या रक्तात गेल्या कितीतरी भारतीय पिढ्यांचे ‘कला आणिनग्नता’ या दोन गोष्टींची परस्परांशी सांगड घालण्यासंदर्भातले नकारात्मक संस्कार घट्ट भिनलेले होते.
कलेतली नग्नता भारतीय समाजात गेली कित्येक शतकं जवळपास निषिद्ध आहे. आध्यात्मिकदृष्टिकोनातून, तत्त्वज्ञानाच्या आवरणाखाली असेल, तरच नग्नता निदान थोडीफार स्वीकारली जाऊ शकते.पण बाकी खजुराहो, गीतगोविंद किंवा भर्तृहरीची शृंगारशतकं या वारशापासून भारतीय समाज आतासंपूर्णपणे तुटलेला आहे. शतकभरापूर्वी रविवर्माने चित्रांद्वारे नग्नतेतील कला पौराणिकतेच्या आवरणातलपेटून भारतीय समाजापर्यंत पोचवण्याचा एक प्रयत्न नक्कीच केला. पण त्यावरही कोर्टकचे-यांचं सावटपडलं. युरोपीय चित्रशिल्पकलेतून उघडपणे मिरवणा-या प्रमाणबद्ध, देखण्या आणि कलात्मक नग्नतेलास्वीकारण्यापासून आपण असंख्य योजने मागे राहिलो ते राहिलोच. एके काळी शिल्पांमधून किंवा इरॉटिकआर्टमधून कलात्मकतेनं समाजातल्या अनेक स्तरांमधे सहज वावरणारा शृंगार आणि नग्नता आताविकृत पॉर्नोग्राफीच्या स्वरूपात आपल्या समाजातल्या अंधा-या कानाकोप-यांमधेच फक्त शिल्लक राहिले.सिनेमा, गाण्यांमधून आपलं केविलवाणं, अप्रत्यक्ष अस्तित्व दाखवत राहिले.

 

 

ठाकूर सिंग यांचं ओलेती’ (सौजन्य: चिन्ह आर्काईव्ह)
समाजात नग्नतेविषयीची इतकी ओढ, औत्सुक्य आणि नग्नतेविरुद्ध होत असलेली ओरडही सर्वात जास्त.हा विरोधाभास का? कशामुळे?
नग्नतेचं आकर्षण ही खरं तर नैसर्गिक, सहज प्रवृत्ती. “टू सी यू नेकेड इज टू रीकॉल अर्थ ” यात कितीसुंदर अर्थ सामावलेला आहे. “तुला नग्नावस्थेत पाहणे म्हणजे भूमीला स्मरणे”. नग्नतेकडे वळणंम्हणजे मूलभूतपणाकडे जाणं.
प्रत्येकच चित्रकाराच्या किंवा शिल्पकाराच्या कलाप्रवासात कधी ना कधीतरी न्यूड फॉर्मकडे आकर्षितहोण्याचा टप्पा आलेला असतोच. चित्रकाराच्या दृष्टीने न्यूड हा एक वेगळाच विषय. निव्वळ रेषांच्यारेखाटनात माध्यमाच्या शुद्धतेचा आविष्कार असतो. नग्नतेतही तीच शुद्धता कदाचित त्याला जाणवतअसावी. कलेतून साकारलेल्या नग्नतेविरुद्ध समाजाच्या रोषाला सामोरे जाणा-या कलाकारांची संख्या खूपमोठी आहे. नग्नतेचं आकर्षण जितकं सनातन आणि कालातीत तितकाच नग्नतेला होत असणाराविरोधही. यामागचं कारण कदाचित समाजाने नग्नतेचा संबंध कायम लैंगिकतेशी जोडला. कलाकारालामात्र त्यामधे काहीतरी खूप पलीकडचे सापडत गेले. नक्की काय असावे ते जे चित्रकाराला कॅनव्हासवरनग्नतेला साकारताना गवसत गेले?
सिंधू संस्कृतीतल्या मातृदेवता, दीदारगंज यक्षिणीच्या रूपातली मादकता, खजुराहो-कोणार्कची शृंगारिककलानिर्मिती यांवर आजवर अनेक अंगांनी अभ्यास झाला आहे. रतिभाव हे आत्मभोगाचे साधन नसूनआत्मप्रकटीकरणाचं, आत्मार्पणाचं, सर्जनाचं साधन आहे; असा भारतीय तत्त्वज्ञानामधला एक विचारघेऊन या कलानिर्मितीकडे पाहता येतं. लैंगिक संबंधांकडे निकोप दृष्टीनं पाहणारा समाज घडवणं हे याकलानिर्मितीमागचं महत्त्वाचं कारण असण्याची शक्यता काही कला अभ्यासकांनी मांडली, तर काहींनी याप्रकारच्या कलानिर्मितीला समाजाची अवनती किंवा मध्ययुगीन सरंजामशाहीतील उत्तान शृंगार असंहीसंबोधलं.
माणसानं संस्कृतिविकासांच्या मार्गावरून प्रवास करताना समाजनिर्मितीच्या एका टप्प्यावर सार्वजनिकजीवनात शरीरावर कपड्यांचं आवरण स्वीकारलं, नीतिमत्तेचे, सभ्यतेचे नियम त्यानुसार ठरवले.सर्वसामान्य माणसाने ते कसोशीने पाळले. पण नग्नतेचं मूलभूत आकर्षण अंत:स्तरावर आपलं अस्तित्वकायमच टिकवून राहिलं. स्वच्छंद मनाच्या कलाकाराला आपल्या कलेच्या विश्वात जेव्हा जेव्हा याबंधनांचा जाच झाला, तेव्हा त्या प्रत्येक वेळी त्याने नागरी सभ्यतेची ती प्रतीकं मुक्तपणे भिरकावून दिली.कलाकाराच्या कलेमधून नग्नता या ना त्या रूपात डोकावतच राहिली. अगदी भारतीय सनातनसमाजातही असे कलाकार प्रत्येक पिढीमधे जन्मत राहिले आणि त्यांच्या कलेतल्या नग्नतेला समाजकधी नाकारत, कधी झिडकारत, बरेचदा उधळून टाकत, क्वचितच स्वीकारत राहिला.
समाजातल्या नैतिक दडपणांना बळी पडून चित्रातली नग्नता नंतर झाकून टाकण्याची झालेली अशीधडपड अर्थातच काही नवी नाही. सोळाव्या शतकात कर्मठ रोमन धर्मगुरूंनी मायकेल अॅलन्जेलोच्या ‘दलास्ट जजमेन्ट’ मधल्या नग्नतेला अंजिराच्या पानांच्या डहाळ्यांनी झाकून टाकून चर्चचे पवित्र वातावरणअबाधित राखण्याची धडपड केली. पुढची अनेक शतकं ही मोहीम चालूच राहिली. ‘द फिग लीफ’ यानावाने कलेच्या क्षेत्रात बदनाम होत राहिली. आज एकविसाव्या शतकातही अशी अंजिराची पानंचित्रांमधल्या नग्नतेला झाकून टाकण्यासाठी धडपडतच आहेत. संपूर्ण नग्नतेला स्वीकारायला सभ्य समाजअजूनही बिचकतो आहे.
Facebook Comments

1 thought on “चित्रकला, लैंगिकता आणि मी २”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *