Uncategorized

चित्रकला, लैंगिकता आणि मी ३

 

डॉ. अल्बर्ट एलिस हे आजचे मानसशास्त्राच्या शाखेमधले महत्त्वाचे तज्ज्ञ. ते म्हणतात, “लैंगिकतेबाबतचेसामाजिक निर्बंध एवढे तीव्र असतात की, ते उघडपणे कबूल करण्याचं धार्ष्ट्य लोकांमधे नसतं. हे निर्बंधदूर होऊन स्वतःच्या लैंगिकतेचा मुक्तपणे स्वीकार केल्यावरच कळेल की, या शब्दात लाजिरवाणं काहीचनाही.”
कलासाहित्यामधील नग्नतेविषयीचे किंवा लैंगिकतेविषयीचे संदर्भ हे सूचक किंवा प्रतीकात्मक पातळीवरचअसावेत असा एक तथाकथित सभ्य समाजाचा आग्रह असतो. पण मग उघडपणे व्यक्त होणारा शृंगारकिंवा लैंगिकता ही कायम असुंदर किंवा बीभत्स या पातळीवरच राहते असं असतं का? चित्रकारितेमधे हाझगडा सातत्याने सुरू राहिलेला आहे. भारतीय मानसिकतेनं शृंगारिक कलाभिव्यक्तीला मनमोकळाप्रतिसाद दिला तो लोककलांमधून. दुर्गा भागवतांच्या मते जिथे जिथे बीजवृद्धीची अपेक्षा असते, तिथे तिथेलोकाचारात व उद्गारात अश्लीलता अटळ असते. लोककलेचा हा थेट आविष्कार चित्रांतूनही दिसतो. मिथिलाचित्रशैलीतली नैना-योगिनीची चित्र, आजक शृंगार कोठ्या निर्माण करण्याची परंपरा, प्रतीकात्मकमिथुनचित्रं आणि नवविवाहित जोडप्यांसाठी कामसूत्राचं ज्ञान देणारी शृंगारचित्रं, पारंपरिक चित्रपरंपरेतीलबांबू, पोपट, वृषभ, शिवलिंग, पूर्णकुंभ, कमळ, नाग इत्यादी प्रतीकं स्त्री-पुरुषांचे संबंध, त्यांच्यातल्यालैंगिकतेचं सूचन करतात.
कलाकाराला आपल्या कलेमधे अपेक्षित असणारं स्वातंत्र्य आणि समाजातल्या नीतिमत्तेच्या संकल्पनायांमधे एक खूप मोठी दरी कायमच राहिली. लोककलेमधून जीवनाला बेधडकपणे भिडणारे लैंगिक संकेतनागरी कलेमधून व्यक्त होताना मात्र नीतिमत्तेच्या पोलादी अंकुशांचा सामना करत राहिले.

गोयाने आपल्या चित्रातल्या नग्नतेला झाकण्याचं नाकारलं. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातल्याव्हिएन्नाच्या ‘शीले’नं चित्रातली नग्नता आणि लैंगिकता ही युद्ध आणि धर्माइतक्या अपरिहार्यतेनेचसमाजाने स्वीकारायला हवी असा आग्रह धरला आणि तो तुरुंगात खितपत राहिला. शीलेची नग्न चित्रंजीवनावर भाष्य करत नाहीत. जीवनाचा एक भाग होऊ पाहतात. समाजाला कलेतल्या नग्नतेचा हाइतका जिवंतपणे आणि थेटपणे जीवनावर पडणारा प्रभाव कधीच मान्य होणारा नव्हता. कुठलीही कलाही ख-या जीवनाचं प्रतिबिंब असते. आर्ट इमिटेट्स लाईफ. हे मान्य केलं व जीवनात जे जे शक्य आहेते ते कलेत उतरवणं शक्य आहे असंही मान्य केलं, तर मग चित्रपटसृष्टीने केलं तसं कलेच्याहीसगळ्याच प्रकारांचं वर्गीकरण का करू नये असाही एक मतप्रवाह यातूनच निर्माण होतो.

पॉल गोगॅं यांचे ’टू ताहिशियन विमिन’

कलेवर झालेला हल्ला हा कायमच क्लेशदायक असतो. हल्ल्यामागे बहुतेकदा काहीही तार्किक संगती नसते.कलेतील श्लील-अश्लीलता वाद तर सनातनच आहे. सनातनी वृत्तीनेच तो मुळात जोपासला. सनातनी,संकुचित मनाला कलेतील अभिजाततेशी काहीच देणेघेणे नसते. कलांची अशी काही स्वतंत्र मूल्येअसतात, जीवनातील मूल्यांशी ती प्रत्येक वेळी समांतर नातं जोडू शकतीलच असं नाही याचं भानसनातनी मनात नसतं. ‘नग्नते’च्या नुसत्या उच्चाराने सनातनी वृत्तीच्या लोकांचं टाळकं सतराव्याशतकात सटकलं, विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकामधेही सटकत होतं आणि तसंच ते आजएकविसाव्या शतकाचं पहिलं दशक उलटून गेल्यावरही सटकतं.

पॉल गोगँने आपल्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत ताहिती बेटावर वास्तव्य केलं आणि तिथला अनोखासूर्यप्रकाश आपल्या लख्ख ताम्रवर्णी देहावर ल्यालेल्या आदिवासी स्त्रियांची अक्षरशः शेकडो नग्न पेंटिंग्जरंगवली. पॅरिसच्या उच्चभ्रू समाजाने गोगँवर अनैतिकतेचा शिक्का मारला. ताहिती तरुणींसोबत आपलेलैंगिक संबंध असल्याचे गोगँनेही कधी नाकारले नव्हते. मात्र आपल्या चित्रांवरचा लैंगिकतेचा आरोप मात्रत्याने धुडकावून लावला. कातडीवर सूर्यकिरणांचे सोने पांघरलेल्या गोगँच्या चित्रांमधल्या त्या ताहितीतरुणींची झळाळती नग्नता इतकी कमालीची नैसर्गिक की त्यांच्याकडे बघताना गोगँने उच्चारलेल्या’देहाची नग्नता चितारताना माझ्या डोक्यात फक्त अवकाश, स्थिती आणि प्रमाणबद्धता असते, लैंगिकविचारांना त्यात जागा नसते’ या वाक्याची सत्यता शंभर टक्के मान्य होते.
या प्राचीन कलाविष्कारात अजूनही समाजात प्रक्षोभ उसळवण्याची ताकद टिकून आहे हे पुन्हा एकदानुकतंच सिद्ध झालं वॉशिंग्टन डी. सी. येथील नॅशनल गॅलरी ऑफ आर्टमधे असलेल्या गोगॅंच्या ‘टूताहितियन वीमेन’वर नुकत्याच झालेल्या हल्ल्यामधून. आदिम जमातीच्या दोन अनावृत्त स्त्रिया अत्यंतनैसर्गिक सहजतेनं बसलेल्या गोगॅंनं चितारलेल्या आहेत. या ताहिती स्त्रियांच्या ताम्रवर्णीय अनावृत्तत्वचेवरचा सोनेरी किरणांचा अनोखा आविष्कार, त्वचेवर जणू सुवर्ण ल्यालेलं आहे असा आभास उत्पन्नकरणारा. नग्नता इतकी आवश्यक सहजतेनं, इतक्या नैसर्गिकरित्या यात चितारलेली आहे की ती वेगळीअशी जाणवतही नाही.
हल्लेखोरांच्या म्हणण्यानुसार गोगॅंच्या या चित्रात दोन नग्न स्त्रिया आहेत आणि त्यातून समलैंगिकतासूचित होऊ शकते. लहान मुलांवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. अमेरिकेसारख्या प्रगत देशामधेजिथे मुक्त लैंगिकतेचा खुला आविष्कार समाज नित्य झेलत असतो, तिथे एका सोळाव्या शतकातचितारल्या गेलेल्या, अभिजात पेंटिंगमधल्या कलात्मक नग्नतेसंदर्भात आज एकविसाव्या शतकातलंपहिलं दशक उलटून गेल्यावर अशी प्रक्षोभक प्रतिक्रिया उमटू शकते. या अत्यंत सुंदर, अभिजातचित्रामधल्या इतर कोणत्याही सौंदर्यापेक्षा त्यातली नग्नताच फक्त बघितली जावी, चित्रातल्या नैसर्गिक,सहज नग्नतेवर लैंगिकतेचा आरोप व्हावा, ती आक्षेपार्ह ठरावी हे दुर्दैव.
अर्थातच ही काही पहिली आणि एकमेव घटना नाही. शतकानुशतकं कलेवर हे असे हल्ले होतच राहिलेलेआहेत. १९१४मधे लंडनच्या नॅशनल गॅलरीमधल्या पाठमो-या नग्न व्हीनसचं चित्र, जिच्यासमोर चित्रातल्याक्युपिडने आरसा धरलेला आहे आणि त्या आरशातून ती स्वत:कडे व आपल्याकडे रोखून पाहत आहे, ते संस्कृतीच्या अशाच अंधरक्षकांनी चाकूने फाडलं, रेम्ब्रांच्या ‘डॅने ईन द हर्मिटेज’वर १९८०मधे ऍसिड फेकूनते विद्रूप केलं गेलं. अभिजात चित्रांवर नग्नतेच्या विरोधात असे हल्ले होतच आहेत.
Facebook Comments

1 thought on “चित्रकला, लैंगिकता आणि मी ३”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *