Uncategorized

चित्रकला, लैंगिकता आणि मी ४

आधुनिक माध्यमांद्वारे होत असलेल्या नग्नतेच्या सततच्या भडीमाराला सरावलेल्या समाजाच्यानजरांनाही पेंटिंगसारख्या, तुलनेनं जुन्या, अती रुळलेल्या कलामाध्यमामधून – जर मानवी देहाचं नग्नदर्शन झालं तर – इतका सांस्कृतिक धक्का का बसावा? चित्र-शिल्पकलेतून आविष्कृत होणारी नग्नताविलक्षण जिवंत भासू शकते. या माध्यमांची ही ताकद आहे. टीव्ही-सिनेमामाधून दिसणार्‍या प्रत्यक्षनग्नतेपेक्षा पेंटिंगमधून चित्रकाराने रेखाटलेल्या रेषांमधून, रंगांमधून जिवंत होणारी नग्नता जास्तपरिणामकारक ठरावी हे अजब आहे. अभिजात कलेमधली ताकद सिद्ध करणारं काहीतरी त्यात आहे हेनिश्चित.
आधुनिक चित्रकारितेमधेही ठाकूरसिंगांच्या १९३० सालातल्या ओलेतीपासून ते हुसेनने चितारलेल्यासरस्वतीच्या चित्रासंदर्भातल्या २००० सालानंतरच्या वादापर्यंत हा झगडा सातत्याने सुरू राहिलेला आहे.कलाकाराला आपल्या कलेमधे अपेक्षित असणारं स्वातंत्र्य आणि समाजातल्या नीतिमत्तेच्या संकल्पनायांमधे एक खूप मोठी दरी राहिली. लोककलेमधून जीवनाला बेधडकपणे भिडणारे लैंगिक संकेत नागरीकलेमधून व्यक्त होताना मात्र नीतिमत्तेच्या पोलादी अंकुशांचा सामना करत राहिले.
कलाभिव्यक्तीमधे नग्न प्रतिमांचा वापर ही तर आदिम प्रेरणा आहे. निसर्गाच्या मूलतत्त्वाच्या शोधासाठी,स्वत:च्या अधिक जवळ जाण्यासाठी, अशा कोणत्याही कारणाने आपल्या कलाप्रवासाच्या दरम्यान न्यूडफॉर्मकडे वळण्याचं चित्रकाराला वाटलेलं आकर्षण हे साहजिक असतं. चित्रकार कॅनव्हासवर न्यूड रंगवतो.अमृता शेरगिलसारख्या आर्टिस्टने सेल्फ न्यूड्स रंगवली. मोनाली मेहेरसारखी लाईव्ह-आर्ट परफॉर्मरजेव्हा न्यूड परफॉर्म करते, तेव्हा स्वत:च्या शरीराला कॅनव्हास मानते आणि त्यामधे काही प्रयोगकरण्याची, स्वत:च्या मर्यादांच्या कुंपणापलीकडलं काही करून बघण्याची इच्छा बाळगते. तसं करणं हेतिला तिच्यातल्या प्रयोगशीलतेला आव्हान देणारं वाटतं. मनाची नग्नता स्वीकारलेल्या कलाकारालाकधीही शारीरिक नग्नतेचं दडपण वाटत नाही. नग्नता ही तिच्या दृष्टीने अत्यंत सहज असते.
मुळात कलेतली श्लील-अश्लीलता ठरवण्याचे निकष काय? अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत कलाकाराची आणिसमाजाची नेमकी भूमिका काय असावी? नग्न चित्र-शिल्प, शृंगारिक कलानिर्मितीबाबत कलाकार आणिसमाजामधे इतका विसंवाद का असावा? आजच्या जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर कलाकाराच्याअभिव्यक्ती स्वातंत्र्याचे बदललेले निकष, कलानिर्मितीच्या बदललेल्या संकल्पना समाजाने आपल्यातरुजवून घ्याव्यात का? कशा? कलेतली नग्नता बहुतांशी स्त्रीदेहापाशीच का घोटाळत राहिली? टीव्हीचॅनल्स, वेबसाईट्स, यूट्यूब, ब्लूटूथ यांसारख्या आधुनिक संवादमाध्यमांद्वारा शारीर नग्नतेचा भडीमारसातत्याने अंगावर घेणा-या नव्या, पौगंडावस्थेत असलेल्या पिढीच्या कलासंवेदनांचं काय? नग्नतेतलीकलात्मकता संवेदनशीलतेनं त्यांच्या मनापर्यंत पोचणार आहे का? कशी?
अश्मयुगीन भित्तिचित्रांपासून, हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन ग्रीकांनी चितारलेल्या पिळदार, नग्न देहांच्याकोरीव चित्रांपासून, प्रत्येक शतकात जन्माला आलेली पेंटिंग्ज, शिल्पं यांपासून् ते नव्या सहस्रकातल्याअत्याधुनिक इन्स्टॉलेशन्स, परफॉर्मन्सेसपर्यंतच्या प्रत्येक कलाप्रवाहात नग्नता प्रामुख्याने आविष्कृतहोतच आलेली आहे. इरॉटिक आर्टचा एक महत्त्वाचा प्रवाहही त्यात सामील आहे. मात्र ऍकेडमिक अंगानेकलेतल्या या नग्नतेचा अभ्यास निदान मराठीत तरी आजपर्यंत कधीही झाला नाही. का झाला नाहीयाचेही एक कुतूहल मनात होते.
नग्नतेचा संबंध आपल्याकडे कायम लैंगिकतेशी जोडला गेला. मग ती कलेतली असो नाहीतरप्रत्यक्षातली. परस्परांत गुंफलं गेलेलं हे समीकरण माझ्याही मनामधे होतंच. पण ‘चिन्ह’चा अंक संपादितकरत असताना कलेच्या संदर्भातून जेव्हा नग्नतेकडे पाहिलं, तेव्हा खूप वेगळे कंगोरे सापडत गेले.आर्टस्कूलमधे चित्रकलेच्या शिक्षणासाठी प्रवेश घेणा-या मुलांचं वय पौगंडावस्थेच्या आसपासचं असतं.कलेच्या इतिहासातल्या नग्न चित्र-शिल्पकृतींचा अभ्यास ते प्रत्यक्ष समोर बसलेल्या नग्न मॉडेलवरूनमानवी देहाकृतीची वळणं रंगवायला शिकण्याचा अभ्यास यादरम्यानचा त्या मुलांचा मानसिक प्रवास कसाअसू शकेल, त्या प्रवासात त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे कलाशिक्षक त्यांच्याशी कसा संवाद साधतात,चार पैसे मिळतात म्हणून ३०-४० तरुण विद्यार्थ्यांसमोर विवस्त्रावस्थेत तासनतास बसताना मॉडेलचीमानसिक अवस्था काय असू शकते, अशा असंख्य पैलूंना समजावून घेताना कला आणि नग्नतेसंदर्भातअजून एक मानवी दृष्टिकोनही समजावून घेता आला. चित्रकार सुहास बहुळकरांनी चित्रांमधल्या नग्नतेच्याइतिहासाचा प्राचीन कालापासून ते आजपर्यंत जो अभ्यास मांडला – अगदी ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’मधेगेली दीड शतके सुरू असणार्या नग्न मॉडेलवरून केल्या जाणार्‍या चित्रांच्या अभ्यासक्रमाचा इतिहास – तोकरत असताना विद्यार्थ्यांच्या, मॉडेल्सच्या मनोव्यापारांबद्दल त्यांनी जे मांडलं त्यातून मनातली सारीगृहितकं उलटीपालटी होऊन गेली. काही भ्रमनिरासही झाले. समाजातल्या काही मान्यवर विचारवंतांनी,कलाकारांनी नग्नता किंवा एकंदरीतच कलास्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भात मत व्यक्त करतानाखाजगीत जी बोटचेपी, सावध भूमिका घेतली; ती धक्कादायक आणि नग्नतेसंदर्भातली समाजाची दुटप्पी,दांभिक भूमिकाच अधोरेखित करणारी ठरली. तरुण, समकालीन कलाकारांनीही अनपेक्षित धक्कापोचवला. परदेशात न्यूडिटी इन आर्ट या संदर्भात किती खुलं वातावरण आहे आणि आपल्या इथे कितीसंकुचित दृष्टिकोन आहे, म्हणून एरवी नाराजी व्यक्त करणारे काही तरुण कलाकार कलेतल्यानग्नतेसंदर्भातल्या वादामधे आपली नक्की भूमिका काय या बाबतीत गोंधळलेले दिसले. परदेशात सहजन्यूड परफॉर्मन्स देणारी कलाकार, आपल्या भारतात असलं काही चालत नसल्यामुळे, मुलाखतीमधेतिच्यासंदर्भात ‘नग्नता’ हा शब्दही जोडून घ्यायला कचरली हा अनुभव घेतला. मात्र अकबरपदमसीसारख्या ज्येष्ठ आणि सुधीर पटवर्धनांसारख्या विचारी चित्रकारांनी कलेमधल्या नग्नतेसंदर्भातकलावंतांचा अधिकार, स्वातंत्र्य यांबद्दल एक ठाम, निश्चित, समाजाला मार्गदर्शनपर भूमिका मांडली.
१९३९ साली र. धों. कर्वे यांनी आपल्या ‘समाजस्वास्थ’ अंकाच्या मुखपृष्ठावर छापलेले डॉ. हॅवलॉक एलिसयांचं अवतरण ‘अश्लीलता हा कोणत्याही लेखाचा, चित्राचा किंवा वस्तूचा गुण नसून, तो फक्त तसा आरोपकरणार्‍यांच्या मनाचा गुण आहे’ आम्हाला ‘चिन्ह’च्या २०११ मधे प्रकाशित झालेल्या अंकावर पुन्हा छापावेलागले यावर अधिक भाष्य करण्याची खरंच गरज आहे?
श्लील-अश्लीलतेच्या मर्यादा ठरवणं हे दुधारी तलवारीसारखं आहे व ते हाताळणं सोपं नाही.श्लील-अश्लीलतेच्या प्रत्येकाच्या जाणिवा वेगवेगळ्या असू शकतात, पण स्वत:च्या वैयक्तिक परीघाबाहेरजेव्हा आपण समाजात वावरतो, तेव्हा एका विशिष्ट, सर्वसाधारणपणे मान्य असलेल्या चौकटीत राहूनवावरणे अपेक्षित असते. ही चौकट धूसर किंवा लवचीक असू शकते, पण ती मान्य असायलाच लागते.इतरांच्या जाणिवा, संवेदना यांचा त्यात आदर असतो. सार्वजनिक ठिकाणी सर्वांच्या जाणिवा-नेणिवा,मानसिकता, उद्देश, श्लील-अश्लीलतेच्या व्याख्या, त्यांचा स्वीकार हे सारखे असणे शक्य नाही; पण मगकलाकाराच्या मुक्त कलाविष्काराचे काय? त्यानं आपल्या कलेचा मुक्त आविष्कार करताना प्रत्येक वेळीया बंधनांचा विचार केला, तर त्याच्या अभिव्यक्तीवर प्रचंड प्रमाणात मर्यादा येऊ शकतात. अशा वेळीकलाविषयक जाणिवा प्रगल्भ असणा-या, प्रशिक्षित नजरेच्या आस्वादकांसाठी आणि कलाकारांसाठी एकास्वतंत्र अवकाशाची निर्मिती असावी हा एक विचार. पण मग सर्वसामान्य जनतेपासून कला अधिकाधिकदूरच जाण्याची यात संपूर्ण शक्यता दिसून येते त्याचं काय?
या दरम्यान माझा स्वत:चाही एक प्रवास झाला. कलेतली नग्नता आता मला सहज स्वीकारता येते,त्याविषयी माझीही एक भूमिका तयार झालेली आहे या आत्मविश्वासातून मी ‘चिन्ह’च्या ‘नग्नता -चित्रातली, मनातली’ विशेषांकाच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारली खरी; पण मनावरचे सांकेतिकसंकोचांचे पापुद्रे मला वाटले होते त्यापेक्षा चिवट निघाले. मुखपृष्ठकथा करताना मोनाली मेहेर यापरफॉर्मन्स आर्टिस्टने परदेशात केलेल्या न्यूड परफॉर्मन्सचे व्हिडिओ किंवा फोटोग्राफ बघताना जरी त्यातअश्लीलता किंवा सवंगपणा कुठेही जाणवला नव्हता, तरी अंकामधे छापण्यासाठी त्यातले फोटो निवडण्याचीवेळ आली तेव्हा, किंवा देवदत्त पाडेकरांनी अत्यंत कलात्मकतेनं चितारलेलं न्यूड अंकाच्या मुखपृष्ठासाठीनिवडताना मनात जी चलबिचल झाली, नग्नतेतली कला वाचकांच्या सर्व स्तरांना समजावून घेता येईलका, त्यांना ती सनसनाटी तर वाटणार नाही, असे प्रश्न पडले, त्यामुळे अस्वस्थता आली.
शेवटी कलेतली नग्नता बघणारी नजर ही जर प्रशिक्षित नसेल, तर त्या कलेवर फार पटकन सवंगतेचा,अश्लीलतेचा शिक्का मारला जाऊ शकतो. चित्रात रेषा महत्त्वाची की कपडे हे जोपर्यंत समजत नाही,तोपर्यंत मनाला कलासाक्षरता आलेली नाही. अशा वेळी पिकासोच्या ‘ब्लू न्यूड’मधली उदास निळाईमनाला भिडण्याअगोदर नजरेला दिसणार ती त्यातल्या रेषांतून आकाराला आलेली नग्नताच.
श्लील-अश्लीलतेच्या मर्यादा ठरवता न येणं यात ‘वैचारिक गोंधळ’ आहे असं मुळीच नाही. ते तरमाणूसपणाच्या गुंतागुंतीचं द्योतक आहे, हे कळून घेण्यापर्यंत झालेला माझ्या मनाचा प्रवास हा पुन्हाकदाचित उलट दिशेनं, पण आता एका ठाम समतोलापर्यंत येऊन पोचणारा झाला याचंही एक समाधान.
शर्मिला फडके
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *