Uncategorized

तुतारीच्या शोधात…


सालाबादप्रमाणे ‘रेषेवरची अक्षरे’चा अंक ह्याही दिवाळीला आपल्यासमोर हजर आहे. मागल्या वर्षात काय झालं? काही ब्लॉग आले, काही ब्लॉग गेले. काही तरले, काही बुडाले. काही मंदावले. काही सुस्तावले.काही दौडले. काही सुटलेच. काही आपले चालले नि काही दुसर्‍यांनीच चालवायला घेतले! त्यांना आपण शुभेच्छा देऊ. चालणार्‍यांना प्रोत्साहन देऊ. सुटलेच आहेत त्यांना सोडून देऊ. दौडणार्‍यांना दौडू देऊ.सुस्तावल्यांना गदगदा हलवू. मंदावल्यांना दमदाटी करून लिहितं करू. बुडलेल्यांना तरलेल्यांनी वंदन करावे. आलेल्यांनी गेलेल्यांच्या रिकाम्या जागा भराव्यात. हे सगळं झालं की कशी ब्लॉगविश्वाची अनुदिनी मागल्या पानावरून पुढे चालू. काही नवं नाही नि काही जुनंही नाही. पण आम्ही एक तुतारी शोधत राहणार. जमेल तसं नवं शोधत राहणार, करत राहणार नि तुम्हांला सारखं तसं सांगत राहणार.
अनुक्रमणिका
संकलित विभाग
******
Facebook Comments

9 thoughts on “तुतारीच्या शोधात…”

 1. अंक मस्त जमला आहे संपादक महोदय..
  वाचतोय एकेक करून. आत्तापर्यंत शर्मिला, किरण, गायत्री यांचं वाचून झालंय. मस्त आहेत सर्वच.

  शर्मिला यांची मेहनत आणि किरण यांचं शब्दप्रभुत्व जाणवते.

 2. अंक छान झालाय. रोदॉ च्या शिल्पानेच सुरुवात छान झालेली. ’लैंगिकता आणि मी’ विभागातले सर्वच स्फ़ुट लेख वाचनीय आहेत. हा उपक्रम सलग चौथ्या वर्षी चालू ठेवला आहात त्याबद्दल खूप अभिनंदन!

 3. छान झालेला आहे अंक.
  वाचतोय यथावकाश.
  या निमित्ताने ब्लॉग जगतावरील निवडक लेखन वाचायला मिळेल ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.

 4. रेषेवरची अक्षरे-२०११ चा यावर्षीचा अंक नेहमीसारखाच वाचनीय आहे.
  अंकातील विशेष विभाग- "लैंगिकता आणि मी" एक वेगळा प्रयोग म्हणून अभिनंदनास पात्र तर आहेच शिवाय या विभागाची भट्टीही खास जमून आली आहे.
  संपादकमंडळाचे अभिनंदन आणि अंकाच्या यशासाठी,पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

 5. @ Dear editorial board,
  Finally a good news…..
  रेषेवरची अक्षरेचं review pkg / ओळख करून देणारं segment उद्या /परवा स्टार माझावर ऑन एअर जाईल ……..
  मी तुम्हांला मेलवर सकाळी वेळ कळवीनच …..पण जर शक्य असेल तर कुणाचातरी मोबाईल क्रमांक पाठवलात तर मी मेसेज करू शकेन …वेळेचा ….मी तुम्हांला तशी मेलही केली आहेच…पण उत्तर आलं नाही म्हणून इथं ही कमेंट…

  – स्नेहल बनसोडे..

 6. रेषेवरची अक्षरेचं review pkg / ओळख करून देणारं segment स्टार माझावर दहाच्या बातम्यांमध्ये ऑन एअर प्रसारित झाला होता. मला ओझरता पहायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *