Uncategorized

तुतारीच्या शोधात…


सालाबादप्रमाणे ‘रेषेवरची अक्षरे’चा अंक ह्याही दिवाळीला आपल्यासमोर हजर आहे. मागल्या वर्षात काय झालं? काही ब्लॉग आले, काही ब्लॉग गेले. काही तरले, काही बुडाले. काही मंदावले. काही सुस्तावले.काही दौडले. काही सुटलेच. काही आपले चालले नि काही दुसर्‍यांनीच चालवायला घेतले! त्यांना आपण शुभेच्छा देऊ. चालणार्‍यांना प्रोत्साहन देऊ. सुटलेच आहेत त्यांना सोडून देऊ. दौडणार्‍यांना दौडू देऊ.सुस्तावल्यांना गदगदा हलवू. मंदावल्यांना दमदाटी करून लिहितं करू. बुडलेल्यांना तरलेल्यांनी वंदन करावे. आलेल्यांनी गेलेल्यांच्या रिकाम्या जागा भराव्यात. हे सगळं झालं की कशी ब्लॉगविश्वाची अनुदिनी मागल्या पानावरून पुढे चालू. काही नवं नाही नि काही जुनंही नाही. पण आम्ही एक तुतारी शोधत राहणार. जमेल तसं नवं शोधत राहणार, करत राहणार नि तुम्हांला सारखं तसं सांगत राहणार.
अनुक्रमणिका
संकलित विभाग
******
Uncategorized

पोस्टमार्टेम २

“बोला! काय म्हणता?” शांतपणे डोळे रोखून त्यांनी मला विचारलं. ह्या माणसाच्या एकंदर व्यक्तिमत्वावरूनच हा उत्तम मानसोपचारतज्ज्ञ असणार हे माझ्या लक्षात आलं. आत्मविश्वासपूर्ण आणि दिलासादायक असा स्वर आणि एक वेगळाच प्रेझेन्स होता त्या माणसाकडे. हसरा, तजेलदार चेहरा आणि वयानं लागलेला चष्मा आणि कानाजवळचे पांढरे झालेले केस. मी त्यांना माझ्या वकिली नजरेनं निरखून पाहत होतो,तेवढ्यात ते पुन्हा म्हणाले, “काय काम काढलंत? ऍडव्होकेट भोळे म्हणाले, तसंच काही महत्त्वाचं काम आहे.”
आता मी त्यांच्यावर नजर रोखली अन्‌ म्हणालो, “माझ्या बहिणीला, नलिनी मुळेला, तुम्ही कसे ओळखता?”
त्यांच्या चेहर्‍याच्या रेषांची सूक्ष्म हालचाल मी टिपली, “डॉक्टर-पेशंट कॉन्फिडेन्शिऍलिटी.” एवढंच ते ठासून म्हणाले आणि त्यांनी एक स्मितहास्य केलं.
“तिनं तुम्हाला मरण्यापूर्वी काहीतरी कुरियरनं पाठवलं ते काय होतं?” मी रागानं विचारलं. मी सहसा साक्षीदारांच्या उलटतपासण्यांच्या वेळीही कधीही रागावत नाही. त्यानं केस बिघडू शकते. पण इथे काहीतरी वेगळंच घडत होतं. माझं मलाच एकीकडे आश्चर्य वाटत होतं.
“डॉक्टर-पेशंट..” त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत मी उठून त्यांच्या बाजूस गेलो आण कोटाच्या खिशातून माझी छोटी लायसन्स्‍ड गन काढली आणि त्यांच्या बरगड्यांवर लावली.
“कुरियरनं काय पाठवलं हे त्यात येत नाही, आणि जरी येत असेल तरी बर्‍या बोलानं ते मला द्या आणि सगळं खरं खरं सांगा. नाही तर तुमचा खून करूनही निर्दोष सुटण्याइतपत चांगला बचाव वकील मी निश्चितच आहे.” माझ्या डायलॉगमधला फिल्मीपणा आणि फोलपणा माझा मलाच कळत होता, पण फासे मी टाकून बसलो होतो आणि आता जे दान मिळेल त्यातनं जिंकायचा प्रयत्न करणं एवढंच हातात होतं.
“यू आर एग्झॅक्टली हाऊ शी डिस्क्राईब्ड. तिच्याबाबत प्रचंड हळवे आणि प्रोटेक्टिव्ह.” त्यांनी एका ड्रॉवरला चावी लावून तो उघडला आणि एक डायरी काढून टेबलावर ठेवली. “बाय द वे, बंदुकीचं सेफ्टी कॅच ऑन आहे.”
मी एकदम वरमलो.
“इट्स ओके मिस्टर मुळे. तुम्ही रोज जशा लोकांमध्ये वावरता, त्या मानानं तुमची प्रतिक्रिया सामान्य आहे. फक्त एक गोष्ट, इथले सगळे सेशन्स व्हिडिओ-रेकॉर्ड होतात, तेव्हा तुम्ही कसेही केस जिंकू शकणार नाही.” ते डोळे मिचकावत म्हणाले.
मी ओशाळवाणं हसलो. मी पहिलं पान उलटून पाहिलं. नलूच्या हस्ताक्षरात तिचं नाव लिहिलेलं होतं.डायरी पाच वर्षं जुनी होती.
मी डायरी उचलली तेवढ्यात डॉक्टर म्हणाले, “एक मिनीट, मिस्टर मुळे. ती डायरी वाचण्याअगोदर मला तुमच्याशी काही बोलायचंय.”
“बोलावं तर लागणारच आहे.”
“तसं नाही. ही बंदूक ठेवून, दोन माणसांसारखं.” त्यांचा आवाज जेन्युईन वाटला मला आणि डोळ्यांतले भावही. वकिली करताना एवढं नक्कीच वाचायला शिकलो होतो. मी टेबलाच्या पलीकडे गेलो आणि डायरी समोर ठेवून त्यावर बंदूक ठेवली आणि त्यांच्याकडे पाहू लागलो. त्यांनी टेबलावरच्या जगमधून पाणी ग्लासात ओतून ग्लासभर प्यायलं, एक ग्लास भरून माझ्यासमोर ठेवलं आणि मग माझ्याकडे पाहून बोलू लागले, “मिस्टर मुळे, आर यू अ होमोफोबिक?”
“व्हॉट द फ… ह्या प्रश्नाचा इथे काय संबंध?”
“काम डाऊन मिस्टर मुळे, इथे संबंध आहे ह्या सगळ्याचा.”
“तो कसा काय?” मी रागानं विचारलं.
“तुमची बहिण समलैंगिक होती. शी वॉज अ लेस्बियन. होमोसेक्श्युअल.”
डॉक्टरांचा प्रत्येक शब्द तप्त शिशासारखा कानात शिरत होता. माझी नलू. होमोसेक्श्युअल.
“डॉक्टर, तुम्ही काय बोलताय ते कळतंय का तुम्हाला?” मी ताडकन उठून उभा राहिलो.
“म्हणून मी म्हणालो की, आपण दोन माणसांसारखं बोलायला हवं.” डॉक्टर माझ्याकडे पाहत म्हणाले. मीथोडा विचार करून खाली बसलो. अन्‌ ग्लासातलं पाणी प्यायलं.
“हे सगळं तिच्या डायरीत आहे?”
“मी तिची डायरी वाचलेली नाहीये. तिनं ती फक्त माझ्याकडे सेफ ठेवण्यासाठी दिली होती.”
“म्हणजे तुम्हाला माहीत होतं की ती आत्महत्या करणार आहे?” माझा आवाज परत चढला.
“नाही. मला ती एवढंच म्हणाली की तिला ती डायरी घरात ठेवायची भीती वाटते, कारण कुणाच्या नजरेला ती पडली तर अवघड होईल.”
“मग तिनं जाळून टाकायला हवी होती.”
“नाही. एक दिवस, ती सांगेल तेव्हा, मी ही तुम्हाला द्यावी असं ती मला म्हणाली होती.”
“मला?” मी विचारात पडलो. ‘मी खरंच होमोफोबिक आहे. टेक्निकली. माझ्या मते होमोसेक्श्युऍलिटी ही विकृती आहे. आजार आहे एक प्रकारचा आणि अशा लोकांना, अशा संबंधांना समाजमान्यता देण्याच्या मी अगदी विरोधात आहे. मग ही डायरी मला…
कदाचित ती मरणार आहे हे तिला ठाऊकच होतं, म्हणून तिनं अशी थाप मारली असेल डॉक्टरांना.
“पण तुम्ही डायरी वाचलीच नाहीत, तर तुम्हाला कसं ठाऊक?”
“ती माझी पेशंट होती.
ओह राईट! माझं डोकंपण ना! म्हणूनच तर ती डॉक्टरांना ओळखत असणार. पण ह्या डॉक्टरांची पेशंट म्हणजे नलू इथे येत होती. अन्‌ मला न भेटताच जातही होती?
“मिस्टर मुळे. तुमच्या होमोफोबिक नेचरमुळे. तुमचे त्यावरचे लेख वाचून ती खूप घाबरली होती. तीतुम्हाला आदर्श मानायची आणि तुम्ही कधीच चुकणार नाही ही तिची श्रद्धा होती. त्यामुळे स्वतःची होमोसेक्श्युऍलिटी कळल्यावर तिला वाटलं की, ही विकृती आहे. हा मानसिक आजार आहे. त्यामुळे तिनं स्वतःच्या गावापासून दूर इथे यायचं ठरवलं. अन्‌ कधी काही गडबड झाली, तर तुम्ही ह्याच शहरात आहात ह्या आधारानं ती इथे आली आणि मला भेटली.”
मी सुन्न झालो होतो.
“मी तिला नीट समजावलं की ही विकृती नाही, हा आजार नाही. हे नैसर्गिक आहे. भिन्नलैंगिकतेइतकंचनैसर्गिक.”
“काहीच्या काही काय बोलता डॉक्टर. तुम्ही तिची अजून दिशाभूल केलीत? तिला प्रोत्साहन दिलंत?” माझापारा पुन्हा चढू लागला होता.
“मिस्टर मुळे. आय नो इट इज डिफिकल्ट टू ऍक्सेप्ट. बट दीज आर फॅक्ट्स. समलैंगिकता ही नैसर्गिक आहे. आणि फक्त माणसांतच नाही, तर प्राण्यांच्या इतर जातींमध्येही समलैंगिकता आढळते. देअर इज नथिंग वन कॅन डू अबाऊट इट.”
माझं डोकं गरगरायला लागलं होतं.
“डॉक्टर, जर समलैंगिकता ही विकृती नसेल, तर काही लोक, जे मी बरे झालेले पाहिलेत, ते कसं?”
“काही जण उभयलैंगिक असतात. ते लोक समाजमान्य संबंध ठेवून स्वतःची दुसरी बाजू झाकून टाकतात.पण दुर्दैवानं काही जीवांना तो पर्यायही नसतो. नलिनी वॉज वन ऑफ देम.”
“पण डॉक्टर मी स्वतः…” अन्‌ मी एकदम थांबलो.
“तुम्ही? काय तुम्ही?” डॉक्टरांनी आश्वासक स्वरात विचारलं.
“मी नुकताच कॉलेजात गेलो असताना, माझ्या एका मित्रासोबत मी एकदा…”
“काय?”
“आम्ही एकमेकांच्या शरीराला स्पर्श केला होता.”
“मग?”
“मग काय? मला ते फारच विचित्र वाटलं. त्यानं एक-दोनदा पुन्हा प्रयत्नही केला होता. मी पुन्हा तसं होऊ दिलं नाही. त्याच्याबद्दल मला विचित्र आकर्षण वाटायचं, पण पुढे पुढे मला जाणवलं की मला कुठल्याच पुरुषाबद्दल तसं आकर्षण जाणवत नाही. मी बरा झालो.”
“तुमच्या मित्राबद्दल जास्त सांगाल का?”
“तो थोडासा फेमिनिन होता. त्याच्या आईसारखे बरेच हावभाव होते त्याचे. मला त्या विचित्र वयात त्याच्या आईबद्दल खूप आकर्षण वाटायचं.”
“हं.” डॉक्टर विचार करत म्हणाले, “आणि त्यानंतर तुम्हाला कधीच कुठल्याही पुरूषाबद्दल आकर्षण वाटलं नाही?”
“कधीच नाही.”
“हे असे अनुभव बरीच मुलं पौगंडावस्थेत घेतात. स्वतःच्या शरीराबद्दल आणि हार्मोन्समधल्या घडणार्‍या बदलांमुळे लैंगिकतेबद्दल उत्सुकता निर्माण होते. उद्दीपित होणार्‍या लैंगिक भावनांचं नक्की काय करायचं हे कळत नाही. मग योग्य लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे मुलं असले प्रयोग करतात. तुमच्यात्याच्याबद्दलच्या आकर्षणाला बरेच कंगोरे होते. तुम्हाला त्याच्या आईबद्दल वाटणारं आकर्षण हाही एक फॅक्टर असावा. त्यामुळे तुम्ही कधीच सम किंवा उभय लैंगिक नव्हतात. तुम्हाला फक्त तसं वाटलं होतं त्यावेळी. त्यामुळे तुम्ही ‘बरे’ होण्याचा काही प्रश्नच नव्हता.”
मी विचारात पडलो होतो.
डॉक्टर पुढे बोलू लागले. “समलैंगिकतेचे अजून कुठले अनुभव आले का तुम्हाला? लहानपणी वगैरे?”
“लहान असताना ट्रेनमध्ये, बसमध्ये कधी कधी काही विकृत माणसं नको तिथे हात लावायची, त्याचीकिळस यायची. मोठा झाल्यावरही एक ओळखीचा विवाहित मनुष्य उगाच कारण नसताना माझा हात हातात घ्यायचा आणि खूपच विचित्र वाटायचं, घृणा यायची त्याची. मी त्याच्याशी बोलणं सोडून दिलं नंतर.”
“हं. समलैंगिकतेशी ओळख कशी झाली तुमची?”
मी थोडा विचार केला. “लहान असताना मी एका मासिकात एक विचित्र कथा वाचली होती. एक शाळेतला मुलगा. ड्रग्जच्या विळख्यात अडकल्यानं शाळेच्या प्यूनकडून त्याचं शोषण होत असतं. त्यालाही त्या शरीरसंबंधांमध्ये त्रास होत नसतो. पण ह्या सगळ्यामुळे त्याचं बालपण कसं नासतं ह्याची ती कथा होती.त्या पात्राचं नाव मी कधीच विसरू शकत नाही – अनिमिष.”
“अजून काही वाचलं होतं का?”
“हो, अजून एक कथा होती. ज्यामध्ये एका मुलावर पौगंडावस्थेत बलात्कार होतो, पण त्याला त्यातून आनंद मिळाल्यासारखं वाटतं. मग तो मोठा होतो, तसतसं त्याला आपण समलैंगिक असल्याची जाणीव होते आणि त्याची शोकांतिका होती.”
“हं. काही सायंटिफिक वाचलंय?”
“नाही. एकदोनदा प्रयत्न केलेला, पण मला ते भंकस वाटतं.”
“हं. एकंदरीत तुमचा संबंध, कथेतून किंवा प्रत्यक्ष, आजपर्यंत केवळ विकृत लोकांशीच आलाय. आणित्यात तुम्ही घेतलेला मित्रासोबतचा अनुभव, ह्यामुळे तुमच्या मनात पूर्वग्रह आहे. केवळ सेक्श्युअल ओरिएंटेशन वेगळं असलेली नॉर्मल, विकृत नसलेली, माणसंही आहेत जगात. किंबहुना तीच जास्त आहेत.पण जगानं मान्यता न दिल्यानं ती लपून राहतात. आतल्याआत कुढत राहतात. नलिनी त्यांपैकीच होती.कुणालाच काही सांगण्याची तिची हिंमत नव्हती.”
मी रात्री उशिरा घरी पोचलो आणि कुणाशीच काही न बोलता थेट नलूच्या खोलीत गेलो आणि दार लावून घेतलं. फोनवर त्या दिवशीही मनीषाचे चार मिस्ड कॉल्स होते. मी फोन स्विच ऑफ केला आणि नलूची डायरी उघडली.
सकाळपासून माझं कशातच लक्ष लागत नव्हतं. नलूची डायरी वाचून ठेवली आणि मला झोपच येईना.तिला कधीच मुलांबद्दल न वाटलेलं शारीरिक आकर्षण, त्यामुळे जाणवत असलेलं वैचित्र्य. कुणालाच न सांगू शकल्यानं येत चाललेला एकाकीपणा. मग मुलींबद्दल वाटू लागलेलं आकर्षण. अन्‌ ह्या डायरीत वारंवार माझा उल्लेख होता. ‘हे दादाला कसं सांगू?’ म्हणून. मग मला आठवू लागलं की एकदोनदा मी आलेलो असताना तिनं माझ्यासोबत समलैंगिकतेचा विषय हळूच काढला होता. पण मी ‘हे फडतूस अन्‌ विकृत विषय सोड गं पिल्लू. चांगलं बोलू की काहीतरी.’ असं म्हणून विषय बदलल्याचं मला आठवलं. तिचीतडफड वाचताना अश्रूंची नुसती धार लागली होती. गेलं वर्ष तर तिच्या प्रत्येक शब्दांत वेदना होती.आई-बाबा, दादा ह्यांना काय वाटेल, त्यांची समाजात किती बदनामी होईल. हेच फक्त. माझ्या नलूनं आमच्यामुळे आत्महत्या केली? मला इतका त्रास होत होता की, त्या दिवशी पहिल्यांदा मी सकाळी दाढी न करताच घराबाहेर पडलो. पोलीस स्टेशनात जाऊन मी तपास अधिकार्‍यांना भेटलो.
Uncategorized

पोस्टमार्टेम ३

“वी हॅव अ लीड!” अधिकारी म्हणाला.
“काय?”
“ती एका सायकिऍट्रिस्टला कन्सल्ट करत होती.” मला अचानक घाम फुटला. “आम्ही तिचे फोन रेकॉर्ड्स पाहिले. अगदी दोन महिन्यांपूर्वीपर्यंत ती बरेचदा कॉल करायची तिथे. तीन महिन्यांपूर्वी तिथे गेलीही होती.तुमच्याच शहरातले डॉक्टर आहेत. आज मी त्यांना इथे बोलावलंय. येतीलच एवढ्यात.”
मी दोन मिनिटं शांत राहिलो. “मला फोन रेकॉर्ड्सची कॉपी देता का?”
“तसं करणं इल्लिगल आहे, पण भोळेसाहेबांशी ओळख आहे तुमची म्हणून देतो.”
डॉक्टरनं सगळं सांगितलं तर बट्ट्याबोळ होईल. जे गुपित राखायला नलूनं आत्महत्या केली, तेच बाहेर येईल. मी डॉक्टरांना फोन लावून किमान दोन दिवस काही न बोलायची विनंती केली आणि त्यांनीही मोठ्या मनानं मान्य केली. नाहीतर माझ्या बंदुकीच्या स्टंटनंतर त्यांनी मला पोलिसात दिलं असतं तरी मला आश्चर्य वाटलं नसतं.
मी नलूची डायरी त्या दिवशीही पुन्हा पुन्हा वाचली. मनीषानं चार कॉल्स केले आणि एकदा तर घरीही येऊन गेली, पण मी खोलीचा दरवाजाच उघडला नाही. तिचं अचानक माझ्याशी काय काम होतं कळत नाही. मला डम्प करून समाधान नव्हतं का झालं तिचं?
पण नलूची डायरी वाचताना मला एक विचित्र गोष्ट दिसली. शेवटची काही पानं फाडली होती. पण शेवटच्या पानावर लिहिलेलं मागच्या पानावरून कळू शकतं. सिनेमात पाहिलेली ट्रिक मी प्रत्यक्षात केली, पण ती काही एवढी फळली नाही. फक्त मधू एवढं एक नाव लिहिलेलं आढळलं. मग एकदम डोक्यात दिवा पेटला.हे नाव मी कॉल रेकॉर्ड्समध्ये पाहिलंय. महिन्याभरापूर्वीपर्यंत अगदी वारंवार. तासंतास बोलणं झाल्याचे रेकॉर्ड्स आहेत. तिच्या सेलफोन डायरीतला नंबर असल्यानं थेट नावच आलं रेकॉर्ड्समध्ये. पण तिचं नाव असलेलं पान फाडण्याचं प्रयोजन काय? मी आईला हळूच मधूबद्दल विचारलं. तर ही माधुरी नामक मुलगी नलूची अगदी खास मैत्रीण. अभ्यासाला बरेचदा यायची आणि रात्री राहायची. तिचं गेल्या महिन्यात लग्न झालं. मी मनाशीच एक अंदाज बांधला.
संध्याकाळी मी थेट माधुरीच्या घरी पोचलो. का कुणास ठाऊक पण माझी शंका खरी असावी अन्‌ नलूच्या आत्महत्येचं कारण हेच असावं असं मला वाटू लागलं. स्वतःची अपराधी भावना कमी करायला असेल कदाचित, पण नलू गेलीय हा विचार सोडून ती आपल्यामुळे गेली नाही ह्यामध्ये एक तकलादू दिलासा शोधायचा प्रयत्न माझं मन करत होतं.
माधुरीनं मला पाणी आणून दिलं आणि माझ्यासमोर बसली.
“तुमचे मिस्टर कुठेयत?” मी सहज इथेतिथे पाहत विचारलं.
“येतीलच एवढ्यात ऑफिसातून.” ती थोडीशी गोंधळली होती. माझ्या येण्याच्या कारणाचा अंदाज तिला येत नव्हता.
“मला तुमच्याबद्दल आणि नलूबद्दल सगळं ठाऊक आहे.” मी थेट मुद्द्यालाच हात घालत अंधारात तीर मारला.
“काय?” ती एकदम गडबडली. माझी खात्रीच पटली.
“सगळंच!” मी शांतपणे अन्‌ ठामपणे तिच्या डोळ्यांत पाहत म्हणालो.
ती दोन मिनिटं डोळे विस्फारून माझ्याकडे पाहत राहिली.
“पण माझ्यामुळे नाही केलं तिनं हे!” असं म्हणून ती ढसाढसा रडायला लागली.
“मी दुसरा ग्लास भरून तिला पाणी दिलं. “काय म्हणाली ती जाण्यापूर्वी? तुमच्याशी बोलली होती का?”
“मी लग्न करायचा निर्णय घेतल्यावर ती माझ्याशी खूप भांडली. रडली. वैतागली. पण मी तरी काय करू.माझ्या आई-वडलांचा मी विचार केला. तिलाही हेच करायचा सल्ला दिला मी. पण तिला ते शक्य होणार नाही असं तिचं मत होतं. माझ्याकडे हाच एक पर्याय होता. माझं लग्न होईपर्यंत तिनं माझं मन वळवायचा खूप प्रयत्न केला. पण नंतर तिनं माझ्याशी बोलणं टाकलं. मग आठवडाभरापूर्वी तिचा फोन आलेला. मला ’सॉरी’ म्हणाली. इकडचं तिकडचं बोलली. पण ती असं काही करेल असं मला वाटलं नाही.”ती रडतच होती.
“हे बघा. तिनं का केलं, कशासाठी केलं, हे आता महत्वाचं नाही. ती गेलीय हे सत्य आहे. आय जस्ट नीडेड सम क्लोजर, म्हणून मी इथे आलो. स्वतःला दोष देऊ नका. त्यातनं काहीच निष्पन्न होणार नाही. मीस्वतःला तिचा दुसरा बाप मानायचो, पण तिनं हे सत्य माझ्यापासून लपवल्यानं मी भावाची कर्तव्य तरी पार पाडली का, असा संशय येऊ लागलाय मला. पण ह्या सगळ्या पश्चात्तापाचा आता काहीच उपयोग नाही.तुमचं आयुष्य आनंदमय होवो हीच माझ्या नलूची इच्छा असेल. अन्‌ तीच शुभेच्छा देतो तुम्हाला.” अन्‌मी तिथून निघून आलो.
प्रत्यक्षात मला तोकडा दिलासा मिळाला होता, पण तिलाही खोटा का होईना दिलासा देणं भाग होतं.
मी डॉक्टरांना फोन केला आणि त्यांना विनंती केली की, तुम्ही प्रेमभंगाची थियरीच योग्य असल्याची साक्ष द्या. नावं घेण्यास तुम्ही तसेही बांधील नाही. माझ्या ओळखी वापरून मी ही केस लवकरात लवकर क्लोज करेन. कारण जर सत्य बाहेर आलं, तर बरीच घरं उद्ध्वस्त होतील. डॉक्टरांनीही विनंती मान्य केली. मी माझ्या उद्योगाला लागलो. सरकारी वकील, पोलीस सगळ्यांशी व्यवस्थित बोलाचाली उरकून मी घरी आलो तर समोर मनीषा.
“तुला काय हवंय माझ्याकडून?” मी वैतागून एकदाचा बोललो तिच्याशी. मनावरचं ओझं कमी व्हायच्याऐवजी वाढल्यासारखं वाटत होतं.
“तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय.”
“चल.” म्हणून मी तिला नलूच्या खोलीत घेऊन गेलो.
“तुला ठाऊक आहे मी तुला का सोडलं?” मनीषानं एकदम वर्मी घाव घातला.
मी गप्पच राहिलो.
“कारण मला नलिनीबद्दल काही कळलं होतं.”
“काय?” मी एकदमच जोरात बोललो. “काय कळलं तुला?” मी आवाज नियंत्रणात आणून बोललो.
“तेच जे तुला आधीच कळायला हवं होतं. तेच जे सांगायला मी तुझ्यामागे लागले आहे.”
“काय?” मी साशंकपणे विचारलं.
“ती सम..”
“माहितीय मला.” मी तिचं वाक्य तोडत बोललो.
“काय?” आता आश्चर्यचकित व्हायची पाळी तिची होती.
“मला नुकतंच कळलंय ते. पण तुला कसं कळलं?”
“माझा एक मावसभाऊपण समलैंगिक आहे. त्यांची एक संघटना आहे, ज्यांच्या संपर्कात नलिनी आली होती. मला अपघातानंच एकदा कळलं. तेव्हा मी तिलाही ओपनली बाहेर यायला सांगितलं. पण तिनं तू आणि आई-बाबांसाठी तसं करायला नकार दिला. तिची घुसमट मला पाहवत नव्हती.”
“पण ह्याचा अन्‌ माझ्याशी लग्न मोडण्याचा काय संबंध?”
“मी तुझ्याबद्दल अजून माहिती करून घेतली. तुझे समलैंगिकांबद्दल लिहिलेले विषारी लेख शोधून वाचले.अन्‌ तुझ्यासारख्या कोत्या विचारांच्या माणसाबरोबर मी लग्न करू शकणार नाही हे माझ्या लक्षात आलं.पण तिला जेव्हा कळलं की मी लग्न मोडलं, तेव्हा तिनं मला रडतरडत फोन करून विचारलं की माझ्यामुळे तू लग्न मोडलंस का? मी तिला परोपरीनं समजावूनही तिला पटत नव्हतं. तिनं मृत्यूच्या दिवशीही मला फोन केला होता, की माझ्या दादाशी असं नको वागूस म्हणून.” आता मला फोन रेकॉर्ड्समधल्या ओळखीच्या नंबरचं रहस्य उलगडलं.
“हम्म… मग आता काय, माझ्या नलूनं माझ्यामुळे आत्महत्या केली हे सांगून तू मला टोचणी द्यायला आलीयेस का?”
“नाही. उलट आता तरी तू तुझा दृष्टिकोन बदल ही विनंती करायला आलेय. कारण जर गुन्हेगार कुणी असेल तर मी आहे असं मला वाटतंय.”
“झाली विनंती करून? आता जाऊ शकतेस तू. कोत्या विचारांच्या माणसाबरोबर जास्त वेळ घालवू नकोस.”
मनीषा उठून निघून गेली. ती मला तेव्हाही का आवडत होती हे मला कळत नाही.
मी नलूची डायरी समोर घेतली आणि एक निश्वास सोडला.
‘नलू, तू कशामुळे हे पाऊल उचललंस ते कदाचित मला कधीच कळणार नाही. पण माझ्यात एवढी ताकद नाही की, तुझं सत्य मी जगासमोर आणू शकेन. जिवंतपणीही तुझी घुसमट दूर करायला मी तुझ्या कामी येऊ शकलो नाही, पण तुझ्या मृत्यूनंतरही मी फक्त तू कायम त्या कोशातच कशी राहशील ह्याचीच खबरदारी घेतोय. माझ्यासारखा क्षूद्र आणि दुबळा माणूस तर नाहीच, पण असा हतबल भाऊ अन्‌ बापही कुणी नसेल. आता तुझ्या सत्याचं ओझं वागवत आयुष्य काढायचंय पिल्ला. पण एक गोष्ट मात्र नक्की करेन मी. तुझ्यासारख्यांबद्दलचा आकस मात्र नक्कीच काढून टाकलाय मी मनातून. आता स्वच्छ नजरेनं जग बघायचं ठरवलंय. जिथे असशील तिथून पाहतच असशील तुझ्या दादाला. जमलं तर माफ कर. अन्‌तशीच एक मिठी दादासाठी पाठव.
– तुझाच दादा!’
डायरीच्या शेवटच्या पानावर मी हे पत्र खरडलं आणि मग ती डायरी जाळून टाकली. नलूच्या अस्थींसोबत तिच्या डायरीची राखही मी गंगार्पण केली.
– विद्याधर भिसे
Uncategorized
तुतारीच्या शोधात

 

सालाबादप्रमाणे ‘रेषेवरची अक्षरे’चा अंक ह्याही दिवाळीला आपल्यासमोर हजर आहे. मागल्या वर्षात काय झालं? काही ब्लॉग आले, काही ब्लॉग गेले. काही तरले, काही बुडाले. काही मंदावले. काही सुस्तावले. काही दौडले. काही सुटलेच. काही आपले चालले नि काही दुसर्‍यांनीच चालवायला घेतले! त्यांना आपण शुभेच्छा देऊ. चालणार्‍यांना प्रोत्साहन देऊ. सुटलेच आहेत त्यांना सोडून देऊ. दौडणार्‍यांना दौडू देऊ. सुस्तावल्यांना गदगदा हलवू. मंदावल्यांना दमदाटी करून लिहितं करू. बुडलेल्यांना तरलेल्यांनी वंदन करावे. आलेल्यांनी गेलेल्यांच्या रिकाम्या जागा भराव्यात. हे सगळं झालं की कशी ब्लॉगविश्वाची अनुदिनी मागल्या पानावरून पुढे चालू. काही नवं नाही नि काही जुनंही नाही. पण आम्ही एक तुतारी शोधत राहणार. जमेल तसं नवं शोधत राहणार, करत राहणार नि तुम्हांला सारखं तसं सांगत राहणार.
‘रेषेवरची अक्षरे’चे मागचे अंक वाचले आहेत तुम्ही? हा अंक ऑनलाईन स्वरूपात तुमच्या हातात पडला असेल, तर इथेच तुम्हांला ते सापडतील. जर तुमच्यापर्यंत पीडीएफ पोचली असेल, तर ऑनलाईन अंक मिळवून जरूर वाचा. या अंकात काय असतं? दर वर्षी तेच असतं. आधीच मराठी ब्लॉगवर प्रसिद्ध झालेल्या निवडक (आमच्या दृष्टीने दर्जेदार) नोंदी वेचून तुमच्यापुढे ठेवलेल्या असतात. दर वर्षी तेच असलं, तरी तेच तेच कधीच नसतं. दर वर्षी आम्ही आमच्या परीघाच्या बाहेरचे ब्लॉग शोधून पालथे घालतो. कोणी नवीन ब्लॉगर सापडला की आपण त्याचे पी. आर. असल्यागत ‘हो, हो, ह्या ब्लॉगरचं लेखन आलंच पाहिजे अंकात’ म्हणून आमची धडपड सुरू होते. नि कधी एकदा ते सगळ्यांना सांगतोय असं आम्हांला होतं. सकस लेखन करणारे नवे ब्लॉगर्स, जुन्या ब्लॉगर्सचे नवे प्रयोग, नवं सकस लिखाण ह्यासाठी आम्ही अंकाचं काम सुरू झाल्यापासून हपापलेले असतो. पण ह्यातलं आमच्या हातात किती असतं? खरं सांगायचं, तर काहीच नसतं. लोक लिहितात. का लिहितात? आपापल्या कारणांसाठी लिहितात. त्या कारणांत रेषेवरची अक्षरेसाठी हे कारण कुणाचंच नसतं (नसावं!). मग लोक जे लिहितात, त्यातलं आम्ही आपलं वेचून ठेवतो तुमच्यापुढे. मग नवं काय करायचं किंवा नवं कुठे, कसं शोधायचं याबाबत असंख्य वाद आम्ही वर्षभर घालत बसतो. नि त्यातच ‘रेषेवरची अक्षरे’मध्ये आजवर ज्यांचे लेख आले, त्या सर्वांना गोळा करून एकत्र ठेवण्याचा घाट घालत असतो.
ही मंडळी आमची गिनिपिगं आहेत. मागे एकदा मारे आम्ही एक कविता/संकल्पना देऊन लेखन मागवायचा प्रयोग केला. तो सपशेल फसला. तो अंक केवळ ब्लॉगसंकलनासहच निघाला. मग पुढच्या वर्षी ह्यांच्याकडून आपापलं लिखाण-ब्लॉग-माध्यम ह्यासंबंधी लेख मागवून चर्चा घडवून आणायचा घाट घातला. लोक उत्साहाने उतरले, पण वाचकांचा प्रतिसाद? शून्य. कारण कळायला मार्ग नाही. कारण कसं शोधायचं हेही आम्हांला माहीत नाही. पण तरीही आपली आमची नव्याची नवलाई संपेना. मग यंदा एका विषयावर लेख मागवले आहेत – ‘लैंगिकता आणि मी’. हाच विषय का? आम्हांला आवडला म्हणून. जुन्या लेखकांसह काही इतर ऑनलाईन मंडळींना व ब्लॉगर्सना यात आमंत्रित केलं होतं. त्यांचे लेख ह्या अंकात समाविष्ट आहेत. ह्यात लेख पाठवलेल्या सर्वांनी ज्या उत्साहाने व गांभीर्याने ह्यात सहभाग घेतला, तो आमचा उत्साह वाढवणारा आहे. त्याचबरोबर आपल्याला कुणीतरी गांभीर्याने घेतंय या आकलनामुळे जबाबदारीची जाणीवही करून देणारा आहे. त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.
ब्लॉगर मित्रमैत्रिणींनो, आम्हांला एक तुतारी शोधत जायला एवढं पुरतं. खरंच. निदान अद्याप पुरत होतं. पण ते किती दिवस पुरेल हे कसं सांगणार? त्यासाठी तुम्हीही काही नवं करायला हवं. ब्लॉगविश्वात काही नवं होत राहिलं, तर ते ‘रेषेवरची अक्षरे’मध्ये उमटत राहील. एरवी आम्ही चार वर्षांपूर्वी साठ ब्लॉग पालथे घातले होते, ते आता जवळपास एकशे नव्वदापर्यंत गेले आहेत. ते वाचून आमची संकलन करताना तयार झालेली नजर, आलेली पकड नि आमच्यात तयार झालेली लेबलं ह्यांच्या साह्याने यंत्रवत सफाईने संकलन करता येतंच आहे की आम्हांला आताशा. पण सकस लिखाण मात्र ब्लॉगसंख्येच्या प्रमाणात वाढताना दिसत नाही, हेपण सांगायलाच हवं तुम्हांला. आम्हांला तुतारीच्या ध्येयाचा फाजील ध्यास नाही, पण त्यासाठी नव्या वाटा ढुंढाळण्याचा हव्यास आहे. दाखवाल त्या? तुमच्या काही न करण्यात आमच्या मर्यादा आहेत आणि तुमच्या प्रयोगांत आमच्या नव्या वाटा आहेत. आणि कृपया ‘हो, पण काय करायचं नवीन?’ हा प्रश्न विचारू नका. ते आम्हांला माहीत असतं, तर आम्हीच नसतं केलं? नि तेही आम्हीच सांगायचं, तर मग तुमचे ब्लॉग कशासाठी आहेत? ते जरा वापरा. प्लीज.
भेटूच.
दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छांसह,
ए सेन मॅन, ट्युलिप, मेघना, संवेद
संपादक
‘रेषेवरची अक्षरे’
२०११
Uncategorized

तुतारीच्या शोधात

सालाबादप्रमाणे ‘रेषेवरची अक्षरे’चा अंक ह्याही दिवाळीला आपल्यासमोर हजर आहे. मागल्या वर्षात काय झालं? काही ब्लॉग आले, काही ब्लॉग गेले. काही तरले, काही बुडाले. काही मंदावले. काही सुस्तावले. काही दौडले. काही सुटलेच. काही आपले चालले नि काही दुसर्‍यांनीच चालवायला घेतले! त्यांना आपण शुभेच्छा देऊ. चालणार्‍यांना प्रोत्साहन देऊ. सुटलेच आहेत त्यांना सोडून देऊ. दौडणार्‍यांना दौडू देऊ. सुस्तावल्यांना गदगदा हलवू. मंदावल्यांना दमदाटी करून लिहितं करू. बुडलेल्यांना तरलेल्यांनी वंदन करावे. आलेल्यांनी गेलेल्यांच्या रिकाम्या जागा भराव्यात. हे सगळं झालं की कशी ब्लॉगविश्वाची अनुदिनी मागल्या पानावरून पुढे चालू. काही नवं नाही नि काही जुनंही नाही. पण आम्ही एक तुतारी शोधत राहणार. जमेल तसं नवं शोधत राहणार, करत राहणार नि तुम्हांला सारखं तसं सांगत राहणार.
‘रेषेवरची अक्षरे’चे मागचे अंक वाचले आहेत तुम्ही? हा अंक ऑनलाईन स्वरूपात तुमच्या हातात पडला असेल, तर इथेच तुम्हांला ते सापडतील. जर तुमच्यापर्यंत पीडीएफ पोचली असेल, तर ऑनलाईन अंक मिळवून जरूर वाचा. या अंकात काय असतं? दर वर्षी तेच असतं. आधीच मराठी ब्लॉगवर प्रसिद्ध झालेल्या निवडक (आमच्या दृष्टीने दर्जेदार) नोंदी वेचून तुमच्यापुढे ठेवलेल्या असतात. दर वर्षी तेच असलं, तरी तेच तेच कधीच नसतं. दर वर्षी आम्ही आमच्या परीघाच्या बाहेरचे ब्लॉग शोधून पालथे घालतो. कोणी नवीन ब्लॉगर सापडला की आपण त्याचे पी. आर. असल्यागत ‘हो, हो, ह्या ब्लॉगरचं लेखन आलंच पाहिजे अंकात’ म्हणून आमची धडपड सुरू होते. नि कधी एकदा ते सगळ्यांना सांगतोय असं आम्हांला होतं. सकस लेखन करणारे नवे ब्लॉगर्स, जुन्या ब्लॉगर्सचे नवे प्रयोग, नवं सकस लिखाण ह्यासाठी आम्ही अंकाचं काम सुरू झाल्यापासून हपापलेले असतो. पण ह्यातलं आमच्या हातात किती असतं? खरं सांगायचं, तर काहीच नसतं. लोक लिहितात. का लिहितात? आपापल्या कारणांसाठी लिहितात. त्या कारणांत रेषेवरची अक्षरेसाठी हे कारण कुणाचंच नसतं (नसावं!). मग लोक जे लिहितात, त्यातलं आम्ही आपलं वेचून ठेवतो तुमच्यापुढे. मग नवं काय करायचं किंवा नवं कुठे, कसं शोधायचं याबाबत असंख्य वाद आम्ही वर्षभर घालत बसतो. नि त्यातच ‘रेषेवरची अक्षरे’मध्ये आजवर ज्यांचे लेख आले, त्या सर्वांना गोळा करून एकत्र ठेवण्याचा घाट घालत असतो.
ही मंडळी आमची गिनिपिगं आहेत. मागे एकदा मारे आम्ही एक कविता/संकल्पना देऊन लेखन मागवायचा प्रयोग केला. तो सपशेल फसला. तो अंक केवळ ब्लॉगसंकलनासहच निघाला. मग पुढच्या वर्षी ह्यांच्याकडून आपापलं लिखाण-ब्लॉग-माध्यम ह्यासंबंधी लेख मागवून चर्चा घडवून आणायचा घाट घातला. लोक उत्साहाने उतरले, पण वाचकांचा प्रतिसाद? शून्य. कारण कळायला मार्ग नाही. कारण कसं शोधायचं हेही आम्हांला माहीत नाही. पण तरीही आपली आमची नव्याची नवलाई संपेना. मग यंदा एका विषयावर लेख मागवले आहेत – ‘लैंगिकता आणि मी’. हाच विषय का? आम्हांला आवडला म्हणून. जुन्या लेखकांसह काही इतर ऑनलाईन मंडळींना व ब्लॉगर्सना यात आमंत्रित केलं होतं. त्यांचे लेख ह्या अंकात समाविष्ट आहेत. ह्यात लेख पाठवलेल्या सर्वांनी ज्या उत्साहाने व गांभीर्याने ह्यात सहभाग घेतला, तो आमचा उत्साह वाढवणारा आहे. त्याचबरोबर आपल्याला कुणीतरी गांभीर्याने घेतंय या आकलनामुळे जबाबदारीची जाणीवही करून देणारा आहे. त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.
ब्लॉगर मित्रमैत्रिणींनो, आम्हांला एक तुतारी शोधत जायला एवढं पुरतं. खरंच. निदान अद्याप पुरत होतं. पण ते किती दिवस पुरेल हे कसं सांगणार? त्यासाठी तुम्हीही काही नवं करायला हवं. ब्लॉगविश्वात काही नवं होत राहिलं, तर ते ‘रेषेवरची अक्षरे’मध्ये उमटत राहील. एरवी आम्ही चार वर्षांपूर्वी साठ ब्लॉग पालथे घातले होते, ते आता जवळपास एकशे नव्वदापर्यंत गेले आहेत. ते वाचून आमची संकलन करताना तयार झालेली नजर, आलेली पकड नि आमच्यात तयार झालेली लेबलं ह्यांच्या साह्याने यंत्रवत सफाईने संकलन करता येतंच आहे की आम्हांला आताशा. पण सकस लिखाण मात्र ब्लॉगसंख्येच्या प्रमाणात वाढताना दिसत नाही, हेपण सांगायलाच हवं तुम्हांला. आम्हांला तुतारीच्या ध्येयाचा फाजील ध्यास नाही, पण त्यासाठी नव्या वाटा ढुंढाळण्याचा हव्यास आहे. दाखवाल त्या? तुमच्या काही न करण्यात आमच्या मर्यादा आहेत आणि तुमच्या प्रयोगांत आमच्या नव्या वाटा आहेत. आणि कृपया ‘हो, पण काय करायचं नवीन?’ हा प्रश्न विचारू नका. ते आम्हांला माहीत असतं, तर आम्हीच नसतं केलं? नि तेही आम्हीच सांगायचं, तर मग तुमचे ब्लॉग कशासाठी आहेत? ते जरा वापरा. प्लीज.
भेटूच.
दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छांसह,
ए सेन मॅन, ट्युलिप, मेघना, संवेद
संपादक
‘रेषेवरची अक्षरे’
२०११

resh.akshare@gmail.com

Uncategorized

मास्तरांच्या नसण्याचं ऊन

दु:खाचे कढ हळुहळू ओसरले. अभावाचा एहसासही निवला. या वेळेच्या ‘मुक्तशब्द’च्या अंकात नामदेव ढसाळांनी सुर्वेमास्तरांवर लेख लिहिलाय; तो मुळातून वाचावा असा आहे. महत्त्वाचा आहे. कारण लेख फक्त कौतुक संप्रदायातला नाही. ‘अज्ञानापोटी अति कौतुक’ हा मराठी वाङमयास ग्रासणारा दुर्गुण तर आहेच, परंतु तो अनेक सुमार मनोवृत्तींचं द्योतक आहे. चलाख आणि सुमार माणसाला आपण सुमार आहोत हे कळलं की तो ‘सर्वांचं बेफाट कौतुक’ अशी सर्वसमावेशक रणनीती आपलीशी करतो. ही केवळ खुशमस्करेगिरी नसते, तर हा विनिमय असतो. ‘मी तुमचं कौतुक करतो, तुम्ही माझं सुमारत्व उघडं पाडू नका’ असा चलाख विनिमय! पण नामदेव ढसाळांचा लेख ( या वेळी तरी) विनिमयाच्या कंगोर्‍यापलीकडचा म्हणून महत्त्वाचा आहे. मास्तरांनी सत्तरच्या दशकानंतरचं बदलतं गिरणगाव, तिथलं राजकारण का टिपलं नाही, असा प्रश्न नामदेव ढसाळ विचारतात. त्याचा खोलात विचार करावाच लागतो. सुर्वेमास्तरांबद्दल असे काही प्रश्न पडतात आणि काही अनुत्तरितही राहतात.
सुर्वेमास्तरांच्या निधनानंतर त्यांचा मानसपुत्र मुकुंद सावंत यांनी टाटा समाजविज्ञान संस्थेत श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. त्या दिवशी त्या समाजविज्ञान संस्थेत त्या बहुतांश अमराठी समूहात मास्तरांना आठवताना कवितेचा, जगण्याचा, डाव्या चळवळींचा मोठा पट सामोरा आला. संस्कृतीला काचणारे प्रश्न कविता निर्भयपणे मांडते आणि जिथे माणसं बघू इच्छित नाहीत अशा, कार्पेटखालच्या वास्तवावर तीव्र उजेड पाडते. मास्तर तर भारतीय संस्कृतीला फास लावणार्‍या अनेक प्रश्नांच्या तिठ्यावर उभे होते. त्यांच्या कवितेनं मराठी सारस्वताला भानावर आणलं. इश्क आणि इन्किलाब या उर्दू परंपरेतल्या दोन भूमिकांवर त्यांनी कामगार वर्गाच्या अनुभवांचं जे अफाट कलम केलं, ते किती महत्त्वाचं! आणि त्यांचा मनात अपराधीभाव बाळगणारा बाप. नात्यांच्या ताण्याबाण्यातून उलगडणारं शहराचं लुम्पेन वास्तव. किती अमानवी वास्तवाच्या डोळ्यात डोळा घालून पाहिलं मास्तरांनी.
हिंदू कुटुंबानं वाढवलेला हा ‘जातलेस’ माणूस. ‘मास्तरांची सावली’ हे कृष्णाबाईंचं आत्मचरित्र वाचून वाटतं, की अशा ‘बाळगलेल्या’, ‘पाळलेल्या’ – पण नाही, फक्त ‘बाळगलेल्या’ – या मुलानं या ‘गुंग्या ग्रहावर’ स्वत:ची किती ‘अस्खलित सिग्नेचर’ उमटवली. मेघना पेठेचा ‘अजातपुत्रास अनौरस आईचा अनाहूत सल्ला’ त्याच सुमारास प्रसिद्ध झाला होता. वाटलं, मास्तरांना अशा अनौरस आईचा अनाहूत सल्ला जणू आतून कळला होता. म्हणून कवितेसदृश कोणतंही वातावरण नसताना हा नारायण कवितेत व्यक्त झाला.
‘जातलेस असणं’ हा एक काच; तर दुसरा काच म्हणजे सर्व मराठी काव्यपरंपरा ‘विठोबाग्रस्त’ असण्याचा. या भक्तीपलीकडे जाणारा सुर्वेमास्तर हा पहिला लोकयत महान कवी. करंदीकरांनी, मुक्तिबोधांनी मार्क्सवादी कविता लिहिली, परंतु त्या अर्थानं मास्तरांनी फक्त माणसाची कविता लिहिली. स्वत:ची जातकुळी तुकोबा, केशवसुत, मर्ढेकर अशी तपासून पाहूनही मास्तर निराळे राहिले. भवताली सारा खरेपणा, सच्चाई गिळून टाकणारं वास्तव असतानादेखील ते कवितेत जेन्युईन राहिले यात मास्तरांची महत्ता आहे. त्यांची कविता हीच नव्या क्रांतीची पताका.
मास्तरांच्या कवितेत कित्येक पात्रं भेटतात. त्यांतला ‘जिवा’ माझा सगळ्यात लाडका. ‘तुमच्या त्या उदास रात्री मला नकोत’ म्हणून कवींनाही प्रॅग्मॅटिक फटकारणारा. मास्तरांनी माणसाला आणि मार्क्सला कवितेत खेचून आणलं. मास्तरांच्या चरित्रातले विविध तिढे, त्यांचं कामगारवर्गातलं स्थान या सार्‍यांमुळेच त्यांची कविता वेगळी झाली. मात्र असं सारं असूनही मास्तरांचा सुलभ डावेपणा कधी कधी डाचतो. त्याचबरोबर याच सोप्या/ सुलभ , ‘डाव्या’ कवीला जवळ करताना मुंबईतल्या तमाम ‘बॉम्बेवासियांची’ मास्तरांप्रती असलेली टोकन चॅरिटी ऊर्फ ‘लटकी सहानुभूती’ मला त्रास देते. जर या क्रयविक्रयाच्या विक्राळ शहरात, जिथे पैसा सर्वस्व झाला, तिथं इतर कवींचं काय झालं याची पर्वा कधी कोणी फारशी केल्याचं ऐकिवात नाही. त्या शहरात या ‘बॉम्बेवासियां’नी मास्तरांच्या कवितेवर प्रेम केलं, की मास्तरांच्या टोकन अस्मितेवर, असा प्रश्न नेहमी मला पडतो. पण मास्तरांना हे कळूनही मास्तर साधे राहिले. टोकन म्हणून ते कौतुक स्वीकारतही राहिले.
वसंत सीताराम गुर्जर, तुळशी परब, वाहरू सोनावणे या माणूसकेंद्री कवितेच्या परंपरेतल्या पुढल्या कवींचं काय झालं? की मास्तरांच्या कवितेला ‘लटकी सहानुभूती’ दाखवून आम्ही इतर ‘बॉम्बेवासियां’प्रमाणे नंतरच्या कवींना विसरलो? हे आता मास्तर गेल्यानंतर तरी खरेपणानं आपण आपल्याला विचारायला हवं. काय करता येईल या कवितेला घुसमटवून टाकणार्‍या शहरात, ज्यांनी जगण्याशी पंगा घेतला अशा आमच्या कविपरंपरेसाठी? एकीकडून संमेलनाचे घासून बुळबुळीत झालेले ‘तेच ते’ आवाज कानावर पडत आहेत आणि मनात ‘माझ्या तुळशीचं पुढे काय झालं? कुठे गेली त्याची कविता?’ हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
काय पद्धतीचं टोक सुमार राजकारण गाठू शकतं याचा दर संमेलन म्हणजे एक जिवंत नमुना! कमअस्सल कवी, कमअस्सल लेखक प्रसिद्ध होण्यासाठी कायम धडपडतात; पण ज्यांच्या निष्ठांचा, कवितेचा, शब्दांचा आत्मा खणखणीत असतो असे लेखक आणि कवी ‘मला मदत करा किंवा मला मान द्या’ अशी निकृष्ट भीक मागत नाहीत! सुमार साहित्यिकांना माणूस कळत नाही, माणसांना खरं साहित्य कळत नाही अशा विचित्र, सांधा निखळलेल्या चक्रात जी ‘सुमारांची सद्दी’ चालू आहे, ती अंगावर काटा आणणारी आहे.
असो. हे सारं वास्तव रेषेरेषेच्या फरकानं डाचतं…
एकीकडे सुर्व्यांच्या कवितेपेक्षा त्यांच्या ‘टोकन अस्मिते’वर व्यक्त झालेली लटकी सहानुभूती आणि दुसरीकडे बेदरकार शहरातलं कवितेचा गळा घोटणारं साहित्यिक राजकारण. पण ह्या दोन्ही गोष्टींना फाट्यावर मारणारी जिवंत कविता अशी संपत नाही. ती येतेच हट्टानं उगवून – जिथं कविता उगवेल असं कदापि वाटणं शक्य नाही तिथेही!
सु्र्वेमास्तरांसारखी… उकिरड्यावरही!
– ज्ञानदा देशपांडे
Uncategorized

भय इथले संपत नाही…

चौकटीचा मोह कुणाला कधी सुटलाय? आणि चौकट मोडण्याचं अनिवार आकर्षणही?
कुणीसं म्हटलंय, तसा हा न संपणारा खेळ. हिवाळ्यातल्या साळिंदरांच्या खेळासारखा.
एकमेकांच्या उबेसाठी अधिकाधिक प्रेमानं एकमेकांच्या जवळ सरकत राहायचं आणि मग काटे टोचायला लागले की पुन्हा एकदा फणकारून लांब.
लांब-जवळ-लांब-जवळ-लांब….
अंतहीन.
***
कुटुंब। [कुटुऽम्ब] (बा-, बे, बां-) नपुं. सा. ना. – १. विवाहित (पाहा: विवाह) जोडपे, त्या जोडप्याची मुले व जोडप्याशी बहुतकरून रक्ताचे नाते असलेली कमीअधिक वयाची माणसे यांनी बनलेले, एका किंवा अनेक घरांत (पाहा: घर) पसरलेले, परस्परावलंबी आणि परस्परपूरक सदस्य असलेले, दुर्भेद्य सामाजिक एकक. २. पत्नी (लाक्ष.) – आपट्यांचे कुटुंब माहेरी गेलेले दिसते. कौटुंबिक वि. – कुटुंबाशी संबंधित (बाब); सर्व कुटुंबाला एकत्रितपणे उपभोग घेता येण्याजोगा (चित्रपट, नाटक); कुटुंबवत्सल (गृहस्थ) समा.परिवार;
कबिला – कुटुंब, बहुतकरून दूरचे नातेवाईक आणि इतर आनुषंगिक गोष्टी (कुटुंबसदस्य मानले जाणारे पाळीव प्राणी, कौटुंबिक जबाबदार्यात इ.) यांचा एकत्रित समुच्चय.
।संस्था – कुटुंब या एककाच्या माध्यमातून सर्वस्पर्शी सामाजिक व्यवस्था निर्माण करणारी संस्था.
***
आपल्याला लग्न नावाचा प्रकार हवाय की नकोय?
हवा असेल तर कशासाठी कुठल्या-कुठल्या किंमती भरून? चूक-बरोबरचे तर्क निर्धारानं बाजूला ठेवले काही काळ, तरी कुणालातरी दाखवण्यासाठी म्हणून आपला फोटो काढणं आपल्याला जमेल का?
न आवडलेल्या ‘स्थळा’ला नकार देताना पत्रिका ढालीसारखी वापरतात, हे कितीही तार्किक पद्धतीनं पटवून घेतलं, तरी कुणी जोडीदार सापडण्याच्या आशाळ-चिकट मोहापायी आपली पत्रिका+फोटो+अमुक इतका पगार+जात+आवडता लेखक/दिग्दर्शक+ आवडता रंग या छापाची माहिती कुणाला पाठवणं आपल्याला जमेल का?
ज्या भावंडांसोबत वाढून आपण इतके विचारी-बिचारी होऊन बसलो, तीच भावंडं आपापली लग्नं जमवताना ‘अरे, नवीन पंच्याऐशीची मॉडेल्स आलीयेत म्हणे बाजारात’ अशी मस्करी स्वत:शीही करू शकतात आणि त्यांच्या-त्यांच्या घरातली वडीलधारी माणसं या विनोदांवर माफक का होईना हसू शकतात; तर त्यांनाच समकालीन असलेल्या आपल्याला –
संस्कृतीच्या माजघरी-सुखद काळोखातून, स्त्रीमुक्ती आणि मग स्त्रीवादाचे वळसे बळंच पचवत, समलिंगी संबंध हाही नॉर्मल आयुष्याचा एक भाग असू शकतो या जाणिवेच्या कड्यावर बळंच आणून लोटलेल्या आणि तरीही डोळ्यांवरची पट्टी सोडायला हट्टीपणानं नकार देणार्‍या एका समाजात जन्मलेल्या-वाढलेल्या आपल्याला-
कॉलेज आणि तत्सम पौगंडाळू वयातून पुढे आलेल्या, प्रगल्भ आणि नकारात्मक- डोळस आणि कडवट-शहाण्या आणि निबर असलेल्या आपल्याला-
जवळच्या मित्रमैत्रिणींना लग्नाच्या चौकटीत जाऊन निराळंच कुणी होताना पाहणार्‍या आणि आपल्याच निनावी पझेसिव्ह नात्यांचे काच न बोलता चुपचाप साहणार्‍या पिढीतल्या आपल्याला-
जोडीदार या गोष्टीबद्दल कितपत स्वप्नाळू राहणं परवडू शकतं?
तटबंदीबाहेरचे रोकडे प्रश्न. म्हटलं, तर आपण त्या गावचेच नाही असं दाखवत – तिर्‍हाईत खुनशी नजरेनं परतवून लावता येणारे.
तटबंदीच्या आत?
गळ्याला मिठी घालणारं कोवळं भाचरू. नातेवाइकांनी घरात हक्कानं घेतलेला पाहुणचार. निभावलेली परस्परांची दुखणी-बाणी. खिदळत जागवलेल्या मंगळागौरी. पहिल्यावहिल्या पगाराचे पैसे घरी आणल्यावर घरातल्या वडीलधार्‍या माणसानं काढलेली दृष्ट. दबक्या पण उत्साही-खवचट आवाजात केलेली गॉसिप्स…
जी कधीच कसलेच प्रश्न विचारत नाही, जिच्यात सहेतुक निवडीतल्या स्वातंत्र्याचा आणि जबाबदार्‍यांचा लवलेशही नसतो, जी एकत्र राहिल्यावर कुत्र्या-मांजरांबद्दल आणि कुत्र्या-मांजरांनाही चुकत नाही, जिच्यात वाहत्या आयुष्याचा अटळ-हताश-प्रवाही स्वीकार असतो-
अशी ओढाळ-चिकट-निर्बुद्ध माया…
***
विवाह। [विवाऽह] (हा-, ह, हां-) पुं. सा. ना. – स्त्री व पुरुष (पाहा: वधू-वर) यांनी परस्परांशी केलेला; कुटुंबसंस्थेला (पाहा: कुटुंब) जन्म, अधिष्ठान आणि संरक्षण पुरवणारा; आजीव सहजीवनाचा आणि एकनिष्ठेचा सामाजिक करार. (या करारानंतर वधू-वर / स्त्री-पुरुष हे पती-पत्नी होतात आणि एकत्रित सहजीवनाला (पाहा: संसार) सुरुवात करतात. घटस्फोट या आधुनिक विधीने हा करार रद्द करता येतो (पाहा: घटस्फोट)). अनुलोम-, प्रतिलोम-, गांधर्व- इ. (जातींच्या उतरंडी व धार्मिक मान्यता यांच्या प्रतवार्यांलवर आधारित विवाहाचे निरनिराळे प्रकार) समा. लग्न, शरीरसंबंध (कालबाह्य), पाट(लावणे) (धार्मिकदृष्ट्या विवाहाइतकी राजमान्यता नसलेला, पण लोकमान्यता देणारा, उच्चवर्णीयांमध्ये प्रतिष्ठा नसलेला प्रकार, निकाह (मुस्लिम* धर्मातील विवाह);
।बाह्य (संबंध) – लग्नाच्या जोडीदाराखेरीज तिसर्‍या व्यक्तीशी ठेवलेले (शारीरिक / मानसिक / आत्मिक संबंध) (पाहा: व्यभिचार);
।विधी – वधू-वरांच्या कराराला पूर्णत्व देणारा धार्मिक संस्कार. (आधुनिक समाजात धार्मिक विधीचे महत्त्व कमी झालेले नाही. मात्र या विधीशिवाय कराराला वैधता देणारा कायदेशीर विवाहविधीदेखील अलीकडे लोकसंमत होऊ लागला आहे. धार्मिक विधीमध्ये ‘देव, ब्राह्मण आणि वयोवृद्ध’ या साक्षीदारांना परंपरा महत्त्व देते, तर कायदेशीर विवाहविधीमध्ये सज्ञान वधूवर आणि दोन सज्ञान साक्षीदार विधीची पूर्तता करू शकतात.);
।संस्था – विवाह या धार्मिक-सामाजिक विधीच्या माध्यमातून साधनसंपत्ती, सत्ताकारण आणि समाजकारण यांवर नियंत्रण ठेवू पाहणारी; सामाजिक दबावाचा प्रभावी वापर करणारी; काही विशिष्ट अटींच्या पूर्ततेच्या बदल्यात व्यक्तीला समाजगटाचा भक्कम आधार पुरवणारी लोकप्रिय आणि यशस्वी संस्था;
।सोहळा – आप्त-मित्रांचा गोतावळा आमंत्रित करून त्यांच्या मान्यतेसह जाहीरपणे केला जाणारा विवाहविधी व त्यासह सामाजिक दबाव व रूढीपोटी अपरिहार्य होणारे बहुतांशी खर्चीक स्नेहभोजन.
***
घर१। [घऽर] (रा-, रे, रां-)* नपुं. सा. ना. – १. सुरक्षित निवार्‍याला उपयुक्त असे, मालकीचे किंवा भाड्याचे, लहान किंवा मोठे, ठिकाण २. कुटुंबातील (पाहा: कुटुंब, विवाह) सदस्यांमधील चिवट नातेसंबंधांतून जन्म घेणारे जिव्हाळ्याचे वातावरण जेथे आहे, असे वास्तव्याचे ठिकाण; (एखाद्याशी) घरोबा करणे – (एखाद्याशी) विवाह करणे; घर थाटणे – अ] विवाह करून संसाराला सुरुवात करणे आ] नवीन घरात राहायला सुरुवात करणे; (एखाद्याच्या) मनात घर करणे (लाक्ष.) – एखाद्याच्या मनात जिव्हाळ्याची जागा मिळवणे गुलाबी ओढणी घेणार्‍या मुलीने चंदूच्या मनात घर केले, एखादी कल्पना मनात पक्की रुजणे चित्रपटात काम मिळवण्याच्या कल्पनेने तिच्या मनात घर केले समा. आलय, गृह, घरकुल, निवास, सदन;
काम – घरातील स्वयंपाक, साफसफाई, बाजारहाट इ. काम;
जावई – विवाहानंतर पत्नीने पतीच्या घरी राहायला जायचे या रूढीसंमत प्रकाराने न वागता पत्नीच्या मातुलगृही वास्तव्याला येणारा पुरुष;
दार – कुटुंबसंस्थेचा आधार, तसेच त्यातून व्यक्तीला जन्माने प्राप्त होणारी किंवा घर थाटून (आ]) थाटून मिळवता येणारी मालमत्ता.
***
मला ते घर अनेकदा दिसतं स्वप्नात.
तसं ते देखणं.
काहीसं काळोखलेलं. पण देखणंच.
पुढ्यातली बाग, मग अंगणातला मांडव, पडवी, ओटी, माजघर. ओटीवरून माजघरात जाताना लागणारं, एकात एक गेलेल्या अनेक काळ्या-कुळकुळीत नक्षीदार चौकटींचं, भलं-मोठ्ठं दार आणि त्यातून आत गेलं की लगेच उजव्या हाताला माडीचं दार. लाकडी जिन्यावरून वर माडीत गेलं, की मागे विहिरीकडे डोकावून पाहणारी घरगुती स्वभावाची, काहीशी जुनाट भासणारी माडी, मागचं तुळशीवृंदावन आणि पलीकडचं हिरवं परस. पुढे बागेकडे पाहणारी परीटघडीची, शिष्ट पण टुमदार माडी.
माजघरातून आत जाताना प्रशस्त देवघर आणि तिथला तो रोखून पाहणारा गणपती. आत गेलं की चूल-वैलासकटचं, सारवलेलं, कौलाच्या जागी घातलेल्या काचेतून येणारा कवडसा मिरवणारं, अंधारा-उजेडाच्या कोलाजानं न्हालेलं स्वैपाकघर. मागे न्हाणी आणि विहिरीकडे उतरणारी पडवी.
देवघराच्या मागे स्वैपाकघर आणि माजघराला जोडणारी अंधारी बोळकांड. ती थेट बाळंतिणीच्या खोलीच्या दाराच्या पुढ्यात बाहेर पडते…
लालचुटूक कौलं. पाणपट्ट्या. तेलपाणी केलेले पडवीचे एकसारखे लाकडी गज. खिर्र-कट्ट वाजणारा पितळी कड्यांचा झोपाळा.
ओटी आणि पडवीला वेगळं करणार्‍या तीनच दगडी पायर्‍या. मग काळाकभिन्न खांब. खांबापासून ओटीच्या भिंतीपर्यंत एखाद्या सदरेवर असावा तसा डौलदार लाकडी कठडा. त्याला काटकोनात असलेल्या भिंतीवर उघडणारी नक्षीदार जाळीची खिडकी. तिच्यातून डोकावून पाहिलं, तर बाळंतिणीच्या खोलीतल्या खोल अंधाराखेरीज काहीच दिसत नाही…
झोपेतून जाग येते, तेव्हा त्यातल्या देखणेपणापेक्षाही तिथे गोठून राहिलेल्या काळाचं एक चमत्कारिक दडपण जाणवतं. दिवसभर जाणवत राहतं.
एखाद्या करड्या नजरेच्या गूढ पुराणपुरुषासारखं त्या घराचं असणं. आपली जिवंत मुळं जमिनीच्या पोटात खोलखोल विस्तारत गेलेलं, वठल्याश्या भासणार्‍या विस्तीर्ण-करड्या खोडासारखं आणि तरीही ओलसर पालवल्यागत नव्हाळ-पोपटी भासणारं. त्याचं अतीव आकर्षण आणि पराकोटीचा तिरस्कार – एकाच वेळी. त्याच्या काळोख्या थंडगार पोटात खोल दडून काळाचं भान गमावून बसावं असा पावलांना खेचणारा जीवघेणा-रसरशीत-काळाशार मोह, आणि त्याच वेळी आपल्या पाखंडी-बंडखोर-बेताल वागण्यानं त्याची मुळं निर्दयपणे उचकटत जावं-आतल्या बुरसटलेल्या काळोख्या कोनाड्यांना दिवसाच्या निर्लज्ज उन्हात उघडंवाघडं करत जावं असा आतून उसळणारा धगधगता विखार…
या परस्परविरोधी ताकदींचं का हे दडपण? कुणास ठाऊक.
स्वप्न पडायचं थांबत मात्र नाही…
– मेघना भुस्कुटे