कपडे


अंधा-या खोलीतलं जुनं कपाट ब-याच वर्षांनी उघडलं,
तसे आतले अस्ताव्यस्त कपडे अनावर होत कोसळले.
नकोसे झालेले, डांबून ठेवलेले
वातड, खरखरीत, चुरगळलेले
कसर लागून कुरतडलेले
जुनाट, कुबट भपका-याने
गुदमरून टाकणारे…

तेव्हापासून ठरवलंय,
आता आठवणींना असं कोंडायचं नाही..

- सोनल

(http://sonalwaikul.wordpress.com/2010/03/30/%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87/)
Post a Comment