Uncategorized

३१ दिवस… no pain…

५.५५च्या गजराच्या १०-१५ मिनिटं आधीच डोळे उघडतात.
रुममधे wireless सिग्नल येत नाही, म्हणून मी ground floorच्या loungeमधे लॅपटॉप घेऊन बसतो. “इतक्या सकाळी कसा ऑनलाईन?” असं एक मैत्रीण विचारते. “काम” हे माझं नेहमीचं उत्तर.
गेस्ट-हाऊसमधला नंदू रोजचा, एक चमचा साखर आणि आलं घातलेला चहा, आणून देतो.

तेवढ्यात रवींद्र येतो.
“केतन, थोडा बाहर लॉन पर जाके देखो. कितना बढिया हैं…”

पगडीशिवाय सकाळी-सकाळी रवींद्र वेगळाच भासतो. गेस्ट-हाऊसमधेच नुकतीच ओळख झालेली आमची. आयुष्यात मोजून १५-२० मिनिटांपेक्षा जास्ती कधी बोललो नाही आम्ही.
पण सरदार लोकं चटकन मैत्री करणारे.
त्याच्या सहकाऱ्याशी ओळख करून देताना म्हणाला,
“अजय, इनसे मिलो. यह हैं केतन. हमारे परम मित्र…” पुढे मी सध्या काय काम करत आहे, इत्यादी, इत्यादी.

रवींद्रनी खूप जोर दिला, म्हणून बाहेर लॉनवर गेलो. सकाळच्या ६.४५-७ वाजताची वेळ. थोडंसं ढगाळ वातावरण. आकाशात पाखरांचा एक थवा एका मस्त rhythmमधे उडत होता. दोन बंगल्यांच्या मधल्या बोगनवेलावर चिमण्या खेळत होत्या. समोरच्या घराच्या कौलांवर दोन कबुतरं सकाळच्या गप्पा मारत बसली होती. गेस्ट-हाऊसच्या कंपाउंडच्या भिंतीवर एक खार सैरावैरा जॉगिंग करत होती.

स्लिपर्स काढून मऊ गवतावर चालू लागलो. पावलांना गवताचा तो स्पर्श आवडलेला. चालत-चालत लॉनच्या एका टोकाला पोचलो आणि वळलो.

तेव्हा नजरेत आले माझ्याच पावलांचे, दवामुळे उठलेले गवतावरचे ठसे.
मला तरी माझं ते चालणं स्वच्छंद, मनमोकळं वाटलेलं. पण ते ठसे सगळे एकाच सरळ रेषेत उमटलेले.

माझ्या नकळत मी मनमोकळेपणे सरळ रेषेत चालत होतो.

***

गेल्या वर्षीची जन्माष्टमी. शिवाजी पार्कला सेनाभवनासमोरची दही-हंडी. ऑफीसमधून रात्री ८.३०-९ला निघून तिथेच एक तास गर्दीत उभा होतो. ढोल-ताशे आणि प्रचंड जोरात वाजणारं music.

दही-हंडी फोडणाऱ्या ४-५ टीम्स पाहिलेल्या. लक्षात राहिली अदिती. यशस्वी टीमला स्टेजवर बोलवून बक्षीस देत होते. गोपाळांच्या एका टीममधे अदिती होती. सगळ्यात वर चढून तिनं हंडी फोडलेली!

तिला स्टेजवर बोलवून विचारलं एकानी, “तुझं नाव काय?”
-“अदिती निलेश धांडे!”
“तू कितवीत आहेस?”
-“दुसरीत!”
“किती दिवस प्रॅक्टीस केलीस? प्रॅक्टीस करता शाळा बुडवलीस? कुठली शाळा तुझी?”
-“१ महिना आम्ही प्रॅक्टीस केली. शाळा नाही बुडवली. माझ्या शाळेचं नाव आहे…”
“तू एकटी एवढ्या सात मजली पिरॅमिडवर चढलीस – एवढ्या उंचावर तुला भीती नाही वाटली?”
-“नाही!”
“का गं?”
-“माझा बाबा होता ना.. तो दुसऱ्या माडीवर होता पिरॅमिडमधे. पडले असते, तर त्यानी पकडलं असतं मला.”

भीती. ही भीती नसेल, तर काय-काय करू शकतो. आणि भीती नसण्याचं प्रत्येकाचं कारण वेगळंच.
आणि ज्याची भीती वाटते ते झालंच… तर सावरायला जवळचं कोणीतरी पाहिजेच ना…

***

ऑगस्टमधला एक रविवार. ऑफीसमधे रिशी भेटला.
“काय रे! तुम्ही लोकं कधी घरी जाता की नाही?”
रिशी clientच्या मार्केटिंग टीममधे. काहीतरी काम होतं त्याचं म्हणून आलेला.
-“अरे! चाललोच आहे. बोल, काय काम आहे?”
त्याला पाहिजे होतं ते दिलं आणि दुकान बंद केलं.

client ऑफीस गुडगावच्या एका कॉर्पोरेट पार्कमधे. तिथे आणखीन १५ कंपन्यांची ऑफिसेस.
रविवार सुट्टीचा दिवस. त्यामुळे जास्ती वर्दळ नाही.
कदाचित पहिल्यांदाच दिवसा-उजेडी ऑफीसमधून निघत होतो.

चालत चालत कॉर्पोरेट पार्कच्या गेटबाहेर आलो. समोर एक छोटंसं मैदान – पार्किंग लॉट.
एका बाजूला सायकल स्टॅन्ड, मोटर-सायकल स्टॅन्ड. आणि पलीकडे सगळ्या गाड्या असतात, तो भाग आज बराचसा रिकामा.
नेहमी तिथे ३-४ सिक्युरिटी गार्ड्स असतात. आज १०-१२ जणांचा एक ताफाच उभा होता.
मी आलो, तर सगळे एकदम सावध झाले.

रोज सकाळी “गुड मॉर्निंग सर” म्हणत मला visitor’s card देणाऱ्या जतिंदरकडे बघून मी हसलो, आणि म्हटलं,
“काय रे, आज काय चालू आहे? काय special?”
-“कुछ नहीं सर! हम लोग तो बस ऐसे ही… आप भी देखो.”

तिथे थांबलो. समोर २५-३० फुटांवर एक ऍटलस गोल्डलाईन सायकल आडवी पार्क केली होती.
कडक युनिफॉर्म, जड काळे बूट घातलेला एक सिक्युरिटी गार्ड धावत गेला आणि त्या सायकलवरून यशस्वीरित्या उडी मारली!

सगळ्यांनी लगेच टाळ्या वाजवल्या.
बीजिंगमधे तेव्हा ऑलंपिक चालू होतं, तसं इथे ह्यांचं high-jump चालू होतं.

रोजच्या त्याच-त्या आयुष्यात ते लोकं स्वत:चं एक साधं-सरळ सुख शोधत होते.
’शोधत’ शब्द चुकीचा वाटतो. सुख शोधत नाही, मिळवत होते. उपभोगत होते.

***

जूनमधे गुडगावला आल्यापासून काम मस्त चालू आहे. ते आवडतंयसुद्धा. खरं म्हणजे त्याची नशा झाली आहे. एखाद्या रविवारी जर काम नसेल, तर मग भीती वाटते. स्वत:ची भीती. स्वत:च्या रिकाम्या मनाची. त्याच्या वेगवेगळ्या विसंगत विचारांची. वेळ घालवायला सिनेमा, पुस्तकं, गाणी असतातच. पण त्यात मन रमत नाही. किंवा ब्लॉग लिहायचा option. तो option मी जेवढं जमेल तेवढं टाळतो. कारण रिकामं मन. काय लिहायचं हे त्या रिकाम्या विसंगत मनाला कळत नाही.
मित्र-मैत्रिणी-नातेवाईक. सगळेच लांब. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात गुंतलेलं.

सप्टेंबरच्या शेवटच्या शुक्रवारी मेल-बॉक्समधे रजिस्ट्रेशन confirmationची मेल आली. Standard Chartered Mumbai Marathon २००९बद्दल. half marathon जानेवारी १८ तारखेला आहे.
मेल वाचून प्रचंड खूष झालो. (तशीही बऱ्याच दिवसात ना मी कोणाला एखादी मेल टाकली, ना मला कोणी पाठवली). रोजच्या एकसारख्या आयुष्याला एक वेगळी, मनासारखी दिशा मिळालेली.

त्याच दिवशी रेडियोवर दिल्ली half marathonबद्दल ऐकलं.
“बचपन में खुशी थी. हर बात पर दौडने की… आओ… दौडे…”
ही half marathon नोव्हेंबर ९ तारखेला. लगेच online रजिस्ट्रेशन करून टाकलं!

मग डोक्यात आलं, डिसेंबरमधे पुण्यात half marathon असेलच.
नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. ३ सलग महिन्यांत ३ सलग half marathon!
Now, that would certainly be a challenge worth trying or doing!
आधी कधीच केलं नाही!

आधी काय केलंय?
फेब्रुवारी २००७. टॅम्पा, फ्लोरिडा. १५ कि.मी. ९६ मिनिटं.
जानेवारी २००८. मुंबई, महाराष्ट्र. २१ कि.मी. (half marathon). २ तास, ४८ मिनिटं.

३ महिन्यात ३ half marathon. ठरवायला काहीच हरकत नाही, पण म्हटलं एक SWOT analysis करून पाहू.

Strength: नक्कीच ’endurance’!
टॅम्पामधे अंशुमन, प्रवीण आणि शंतनू मला ’दानव’ म्हणायचे.
रोज संध्याकाळी मॅकफारलीन पार्कवर आधी १-१.३० तास क्रिकेट, आणि मग १-१.३० तास टेनिस. जमलं तर पार्कच्या १.१ मैल जॉगिंग ट्रॅकवर २-३ राउण्ड्स.
टॅम्पामधे १५ कि.मी. धावलेलो, तेव्हा स्टामिना बऱ्यापैकी होता. ह्या वर्षी मुंबईमधे half marathon धावलेलो, तेव्हा ’endurance’ कामी आलं होतं.

Weaknesses: ligament behind right knee आणि स्टामिना.
स्टामिनाबद्दल न बोललेलंच बरं.
मुंबई half marathonनंतर जवळ-जवळ ३-४ महिने उजव्या गुडघ्यामागचं ligament दुखत होतं. रोज नाही. पण पुण्यात टेकडीवर गेलं, तिथे जॉगिंग केलं; की अर्ध्या तासानंतर ते ligament दुखायचं.
VoF ट्रेकवर त्या ligament दुखण्याचीच भिती होती. पण thank God! तसं काही झालं नाही.

Opportunity: motivation/challenge आणि timing improvement
३पैकी निदान २ तरी half marathon पूर्ण करायच्या आहेत. rather, तीनही पूर्ण करायच्या आहेत.
मागच्या वेळेस मुंबईमधे २ तास ४८ मिनिटं लागली होती. ह्या वेळेस निदान एक तरी २.३० तासांत पूर्ण करायची आहे.

Threats: आळस आणि recovery time
सोमवार, सप्टेंबर २९पासून रोज सकाळी ६ वाजता उठून जॉगिंग सुरू केलं आहे. मधे फक्‍त ३ दिवस मनाली आणि रोहतांग पासला गेलो, तेव्हा जॉगिंग केलं नाही. दिल्ली half marathonकरता ३१ दिवस राहिले आहेत. रोज सकाळी प्रचंड आळस असतो. तो आळस झटकून प्रॅक्टीस करायची आहे. स्टॅमिना वाढवायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे, एक half marathon झाली की नंतर लगेच लवकर, वेळेत recover व्हायचं आहे. पुढची half marathon पळायला.

सकाळी जॉगिंग करताना पूर्वेच्या उगवत्या सूर्याकडे पाहतो मी.
Every step that I run, I keep telling myself “no pain”.

आंधियों से झगड रही हैं लौ मेरी..
अब मशालों सी बढ रही हैं लौ मेरी..
नामो निशान.. रहे ना रहे..
यह कारवां.. रहे ना रहे..
उजाले मैं पी गया..
रौशन हुआ जी गया..
क्यों सहते रहे..
रुबरू.. रौशनी…

पुढचे ३१ दिवस रोज प्रॅक्टीस करायची आहे. आहारावर नियंत्रण ठेवायचं आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर Michael Clarke म्हणाला तसं,
“the pain of discipline is preferable to the pain of disappointment”.

२१ कि.मी. पळताना प्रचंड आनंद आणि वेदना होतात.
एका ठरावीक अंतरानंतर पाय दुखतात. मधेच सोडावंसं वाटतं.
DJ म्हणतो तसं, “after the body reaches its limit, the mind takes control over the body”.
अशा वेळेस मुंबईमधे पळताना ’रॉकी’मधला Sylvester Stallone आठवलेला.
बॉक्सिंग मॅचची तयारी करताना फिलाडेल्फिया Musuem of Artच्या पायऱ्या, “Gonna Fly Now” गाण्यावर, पळत चढणारा रॉकी आठवलेला.
रॉकीच्या “eye of the tiger” गाण्यानी inspire झालेलो.
कितीही वेदना झाल्या, तरी सारखं स्वत:ला रॉकी सारखं सांगत होतो. “no pain”… “no pain”…

बऱ्याच वेळा self-doubt उद्भवतो. भीती वाटते. आपण कऊ शकू का नाही…
मग आठवतो म्हातारा रॉकी. आत्मविश्वास हरवून बसलेल्या स्वत:च्या मुलाला सांगणारा.

I’d hold you up to say to your mother, “this kid’s gonna be the best kid in the world. This kid’s gonna be somebody better than anybody I ever knew.” And you grew up good and wonderful. It was great just watching you, every day was like a privilige. Then the time come for you to be your own man and take on the world, and you did. But somewhere along the line, you changed. You stopped being you. You let people stick a finger in your face and tell you you’re no good. And when things got hard, you started looking for something to blame, like a big shadow. Let me tell you something you already know. The world ain’t all sunshine and rainbows. It’s a very mean and nasty place and I don’t care how tough you are it will beat you to your knees and keep you there permanently if you let it. You, me, or nobody is gonna hit as hard as life. But it ain’t about how hard ya hit. It’s about how hard you can get it and keep moving forward. How much you can take and keep moving forward. That’s how winning is done! Now if you know what you’re worth then go out and get what you’re worth. But ya gotta be willing to take the hits, and not pointing fingers saying you ain’t where you wanna be because of him, or her, or anybody! Cowards do that and that ain’t you! You’re better than that! I’m always gonna love you no matter what. No matter what happens. You’re my son and you’re my blood. You’re the best thing in my life. But until you start believing in yourself, ya ain’t gonna have a life. Don’t forget to visit your mother.

३१ दिवस बाकी आहेत.
अदितीसारखं कुठलीही भीती न बाळगता मला एक उंची गाठायची आहे.
रोजच्या आयुष्यात एक छोटीशी वेगळी मजा करणाऱ्या त्या सिक्युरिटी गार्डसारखं सायकलवरून उडी मारून ते सुख उपभोगायचं आहे.
रॉकीसारखं “no pain” म्हणत स्वत:चे दोन्ही हात आभाळाकडे उंचावून उभं राहायचं आहे.

I wake every morning at 5.45 before the alarm thats supposed to go off at 5.55.. and I hit the ground.. listening to music.. breathing the fresh early morning air.. watching the gardeners watering the flower beds.. smile at the kids waiting for their school bus.. and tell myself with every step..

तुझमें अगर प्यास हैं..
बारिश का घर भी पास हैं..
रोके तुझे कोई क्यों भला..
संग संग तेरे आकाश हैं..
तु धूप हैं.. छम से बिखर..
तु हैं नदी.. ओ बेखबर..
बह चल कहीं.. उड चल कहीं..
दिल खुश जहां… तेरी तो मंज़िल हैं वहीं…

as the guitar strings hit the crescendo, my pace increases too..
and I keep telling myself with every breath that I take..
“No Pain”…”No Pain”…

मॉशिअर केे

http://asach-aapla.blogspot.com/2008/10/blog-post.html

Facebook Comments

1 thought on “३१ दिवस… no pain…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *