Uncategorized

अनुक्रमणिका

०१. दिशांचे पहारे – क्षिप्रा

०२. बरेच काही उगवून आलेले – नंदन होडावडेकर

०३. ३१ दिवस… नो पेन… – मॉशिअर के

०४. परत एकदा पहिल्यासारखे होणे नाही, होणे नाही – मेघना भुस्कुटे

०५. आरसा आपुलिये / आंगी आपण पाहे / तरी जाणणें जाणों लाहे / आपणयातें – संवेद

०६. फिर पुकारो मुझें… फिर मेरा नाम लो… – ट्युलिप

०७. अगं अगं बशी…!!! – श्रद्धा भोवड

०८. देहबोलीचे ठोकताळे – अबोली

०९. बेचव काळ्या भुंग्याची गोष्ट / उंदरा, कुठंयस तू? – निवेदिता बर्वे

१०. नॅनी – संग्राम

११. सुट्टी सुरू!! / तेल-वेणी – सई केसकर

१२. सावली – विशाखा

१३. स्क्रीन काळा आणि मोठ्ठा गोळा…!!! – नचिकेत गद्रे

१४. याचसाठी केला होता अट्टाहास – राज

१५. चल तर जाऊ… – प्रसाद बोकील

१६. रंगुनी रंगात सार्‍या… – गायत्री नातू

१७. लेजंड ऑफ प्रिन्स धृमण – धृमणाची धर्वणाश्रम भेट – यॉनिंग डॉग

१८. स्तंभावरती चार सिंह – अ सेन मॅन

१९. ह्या बंदिस्त ए. सी. रूमची शपथ! – वैभव जोशी

२०. कुणाच्या ह्या वेणा! – नीरजा

Facebook Comments

6 thoughts on “अनुक्रमणिका”

 1. ब्लॉगवरची शीत-रंगसंगती ठीक आहे. पीडीएफ़ फ़ाईल मध्ये तर सगळा दु:खी खिन्न अंधारच पसरला आहे. आधी नेमकी ती उघडली आणि तो काळा पार्श्वरंग आणि सफ़ेद अक्षरे पाहून २ पानांच्या पुढे वाचवेना.
  जे वाटलं ते प्रांजळपणे लिहीतोये. तुमची खोडी काढायचा हेतू नाही.

  बाकी लेखांचे सिलेक्शन चांगले वाटते आहे. प्रिन्स धॄमणला सामाविष्ट केलेले पाहून विशेष आनंद झाला. 🙂

 2. संपादक,
  मस्त उपक्रम आहे हा तुमचा मी मागचा अंक देखील वाचला आणि कधी कंटाळा आला तर अजुनही वाचतो.मी गेल्या महिन्या भरापासुन ह्या अंकाची वाट पाहात होतो आता हाति लागला आहे म्हणजे ही सुटटी आरामातच जाइल .मला असे वाटते की तुम्ही जास्तीत जास्त ब्लॉग नॉदी समाविष्ट कराव्यात! असॉ.
  या अंकासाठी खुप खुप शुभेच्छा आणि आभारही
  -ओंकार वाळिंबे
  http;//netncrime.blogspot.com

 3. संपादकहो –

  अंक वाचला. मागच्या वर्षीच अंक फारसा आठवत नाही, आणि तो उपलब्ध आहे पण वाचायचा खरं म्हणजे कंटाळा आलाय. पण या वर्षीचा अंक डावा वाटला. अर्थात हा लिखाणाच्या दर्जाचा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल दोष देणं चुकीचं. आणि शेवटी दोन गोष्टी समोरा समोर आल्यावर डावं उजवं होणारंच.

  हा अंक वाचुन मला काय वाटलं? क्षिप्रा, मेघना, ट्युलिप, श्रद्धा – यांचे लेख अपेक्षेप्रमाणे चांगले आहेत. संवेदची गोष्ट ’मुदतपुर्व उचकी लागल्यासारखी’ संपली, आणि कळाली नाही. पण शेवटच्या एक दोन पॅरा पर्यंत सही चालली होती. एकुण – अपेक्षेप्रमाणे. बाकी लोक ठीकठाक.

  या अंकाबद्दल मला भाई आवडलेली गोष्ट म्हणजे – सई केसकर, यॉनिंग डॉग आणि वैभव जोशी – हे नविन सापडलेले लेखक. यॉनिंग डॉग चे काही लेख वाचलेले मागे, पण सई आणि वैभव पहिल्यांदाच वाचले. आपापल्या इथे प्रकाशित लेखांवरुन हे ईमानदार आणि मेजर पोटेन्शियल असणारे लोक आहेत असं वाटलं. आता सांगुन टाकायला हरकत नाही. हा पॅराग्राफ सुरु केल्या नंतर वैभव च्या सगळ्या कविता वाचल्या. त्याच्या एका कवितेवर भर पहाटे पावणे चार वाजता – आह! क्या बात है!! असं मलाच दचकवत मोठ्याने म्हणालो. असं बऱ्याच दिवसांनी म्हणालो याबद्दल बरंच बरं वाटलं. एनीवे.

  या अंकाबद्दल झालेली मेजर चिडचीड म्हणजे – यात तेजस्विनी लेले या व्यक्तिचा एकही लेख का नाही? तिचा ’सहस्त्रावर्तन’ नावाचा लेख मागच्या वर्षी वाचल्या वाचल्या – याच्यापेक्षा चांगला लेख २००९ च्या कुठल्या अंकात आला तर तो अंक भाई असेल असं वाटलं होतं. तसं मला अजुनही वाटतं. अर्थात प्रकाशित होण्या न होण्याची कारणं संपादकांना अधिक माहिती असतील. तिने लेख द्यायला नकार दिला असेल तर तो वेगळा प्रश्न. पण तसं नसेल तर तिच्याशिवायचा अंक हा (मला तरी) खेदजनक प्रकार वाटतो.

  या अंकात अप्रकाशित लिखाणाचा प्रयोग का, कसा वगैरे वगैरे धास्ती होती. त्यामुळे हा प्रयोग पुढे ढकलल्याबद्दल बरं वाटलं. हा प्रयोग स्वतंत्ररित्या यशस्वी होवो अशा शुभेच्छा! फक्त कृपया त्यात कवितांच्या ओळी, शीर्षक वगैरे सारख्या च्यावम्यांव गटांगळ्या घालू नका. समान धागे दर्जात असावेत शीर्षकात नव्हे – असा अनाहुत आणि वैयक्तिक सल्ला.

  एवढं सगळं असुनही – एक अंक लोकांच्या हाती ठेवताना भरपुर मेहनत असते. आवडतं नावडतं वाचायला लागतं. हजाम हजाम गोष्टींवर चर्चा कराव्या लागतात. अनाहुत आणि वैयक्तिक सल्ल्यांना हसतमुखाने कटवायला लागतं. इन जनरल – ढोर मेहनत असते. त्या निष्कपट आणि नि:स्वार्थी मेहनतीबद्दल तुमचे आभार.

 4. होडावडेकर मास्तरांचा लेख वाचला होता आधी. मस्तच झाला आहे. कविता थोड्या जास्त झाल्या आहेत. (आता त्यांना मस्त म्हटले आहे तर थोडे दोषही काढायला हवेत.)

  "चल तर जाऊ…चा" शेवट वाचेपर्यंत हा "पीस" एका बोकिलबुवाने लिहिला आहे असे वाटणारच नाही. जाह्नवीबिन्हवी, गायत्रीफायत्री अशी नावे एक्सपेक्टेड होती. असो. ह्या ब्लॉगवरील लेखनासाठी 'लिंग ओळखा पाहू!' अशी स्पर्धा घ्यायला हवी. नाव न देता उतार द्यायचा आणि लिहिणाऱ्याचे/लिहिणारीचे लिंग ओळखायला सांगायचे. काय म्हणता?

  मेघना भुसकुटे ह्यांचा आरसाही वाचला..
  "पण तेंडुलकरांनी तिला हाताला धरून मधोमध कधी आणलं, ते तिचं तिलाही कळलं नसणार."
  ओहोहो. ह्या असल्या नाटकी वाक्यांनी फार हसू येतं. पण त्या मोकळं लिहितात (भक्त प्रह्लाद सिनेमा वगैरे). ते आवडलं. एकंदर छान.

  'कधी जाणवलं नव्हतं भारतात असताना, की एक "सांस्कृतिक सत्ता" असते. तुम्ही तिचे सभासद असाल, तर तुमच्याकडे देण्यासारखं खूप असतं.'
  हं भारतीय सांस्कृतिक सत्ताधाऱ्यांची अमेरिकन शोकांतिका. प्रामाणिकपणा आवडला.

  आता थोडी अमृता, थोडा गुलज़ार, थोडी मेघना (हो, हो! पेठेच) वाचायला हवी. एकदा का मौसम पकडला की मग इतर लेखही वाचेन म्हणतो.

  असो. हा प्रतिसाद तूर्तास इथेच टाकला आहे.

  "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
  "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 5. अर्रे खजिनाच मिळाला आहे मला हा तर. विकांतात संपवून सविस्तर प्रतिक्रिया लिहितोच आता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *