दिशांचे पहारे
दिशांचे पहारे असे जीवघेणे

कसे व्हायचे सांग भेटीस येणे

सुनी सांजवेळा जराशी उदासी

मुक्या आठवांची सरेना असोशी

उराशी पुन्हा तेच गाणे विराणे

जुने सूर ओढाळ आता कशाला ?

जपावे किती मोह होई मनाला

कुणी सोडवावे खुळे हे उखाणे

धुक्याच्या प्रवाही उभा एकटा मी

तुझा गंध दाटून ये रोमरोमी

वळावे कसे पाय झाले दिवाणेक्षिप्रा


4 comments