Posts

Showing posts from September, 2009

दिशांचे पहारे

दिशांचे पहारे असे जीवघेणे
कसे व्हायचे सांग भेटीस येणे
सुनी सांजवेळा जराशी उदासी
मुक्या आठवांची सरेना असोशी
उराशी पुन्हा तेच गाणे विराणे
जुने सूर ओढाळ आता कशाला ?
जपावे किती मोह होई मनाला
कुणी सोडवावे खुळे हे उखाणे
धुक्याच्या प्रवाही उभा एकटा मी
तुझा गंध दाटून ये रोमरोमी
वळावे कसे पाय झाले दिवाणे


क्षिप्रा


http://kshiprasuniverse.blogspot.com/2008/09/blog-post.html